नुसरत जहाँचा नंबर Busy यायचा, नवऱ्याने तिला जत्रेत नेल अन्... अंगावर काटा आणणारी घटना!
नवऱ्याच्या डोक्यात शिरलं संशयाचं भूत त्यानंतर त्याने जे केलं केलं त्याने गाव हादरलं!
Crime News : नवरा बायकोचं नातं म्हटलं तर रूसवा भांडण सुरूच असतं. मात्र काहीवेळा एकदा का संशयाच भूत डोक्यात शिरलं तर अनेक सोन्यासारखे संसार मोडताना आपण पाहिले आहेत. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये एका नवऱ्याने त्याच्या बायकोचा नंबर व्यस्त लागल्याने धक्कादायक कृत्य केलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
बिहारमधील किशनगंजमध्ये दोन वर्षापूर्वी आरोपी पती रब्बानीचं नुसरत जहा या तरूणीसोबत लव मॅरेज होतं. दोन वर्षांपूर्वी दोघांनी लग्न केलं होतं. रब्बानी पंजाबमध्ये नोकरी करत होता, मात्र जेव्हा जेव्हा नुसरतला म्हणजेच त्याच्या बायकोला फोन करायचा त्यावेळी busy लागायचा.
कायम फोन व्यस्त लागत असल्याने रब्बानीला संशय आला की नुसरतचे दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध आहेत. रब्बानीच्या मनात सशयाचं भूत शिरतं अन् त्यानंतर तो जे करतो त्याने संपूर्ण गाव हादरून जातं. पंजाबमधूनच चाकू विकत घेतो आणि नुसरतला जत्रेत जायचं आहे सांगत घेऊन जातो. मामाच्या घरापासून 10 किमी अंतरावर नुसरतचा गळा चिरून खून करतो.
सिंघिया कुलमणी गावात एका भट्टीजवळ नुसरतचा मृतदेह आढळून येतो. आरोपी रब्बानी पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली देत आत्मसमर्पण करतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून नुसरत आणि रब्बानीला एक मुलगी होती तीसुद्धा त्याने कोणाला तरी विकल्याची माहिती आहे. पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.