लखनऊ : एनसीईआरटी पुस्तकांमधील जून्या कवितांवर नवीन वाद उभा राहिला आहे. 'आम की टोकरी' असे या कवितेचे नाव आहे. सोशलमीडियावरील युजर्स कवितेतील भाषा अश्लील असल्याचं म्हणत आहेत. अनेक युजर्स एनसीईआरटीला देखील ट्रोल करीत आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की, कवितेला बालकांच्या मानसिकतेने पाहिले पाहिजे. म्हणजे कवितेत कोणतेही वाईट अर्थ निघणार नाही. या कवितेत वाईट अर्थ काढणाऱ्यांच्या विचारांमध्ये खोट असल्याची टीकाही अनेक जण करीत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या कवितेवरून वाद सुरू आहे. ती कविता 2005 पासून पाठ्यक्रमात सामिल आहे. कविता सोशलमीडियावरील व्हायरल झाल्यानंतर एनसीईआरटीने उत्तर दिले आहे.  'एनसीईआरटीचे म्हणणे आहे की, स्थानिक भाषांमधून बालकांपर्यंत कविता पोहचवण्यात आली आहे. जेणे करून त्यांची आवड निर्माण होईल. '



एनबीटीच्या काही शिक्षकांनी माहिती दिली की, 2005 साली ही कविता पाठ्यक्रमात सामिल करण्यात आली. ज्याची पहिली आवृत्ती 2006 साली प्रसिद्ध झाली. जानकारांचे म्हणणे आहे की, नवीन शिक्षण धोरण 2020 च्या अनुसार पुस्तकांमध्ये मोठे बदल करण्यात येणार आहे. अशातच छोट्या छोट्या गोष्टींना हवा दिली जात आहे.


साहित्यकारांचे काय म्हणणं आहे?


कविता 'आम की टोकरी'च्या शब्दांवर वाद आहे. आंबे विकणाऱ्या मुलीसाठी 'छह साल की छोकरी' सारख्या शब्दांचा वापर करण्यात आला आहे. 'नही बताती दाम है'...' हमे तो चूसना आम है'... अशा वाक्यांवर देखील सोशलमीडियावर आक्षेप घेण्यात येत आहे. 


एका वरिष्ठ समिक्षकाने म्हटले आहे की, 'कवितेत मुलीच्या प्रतिमेला नकारात्मक पद्धतीने मांडण्यात आले आहे. यामुळे मुलगा आणि मुलींमध्ये समानतेचा भाव तयार होत नाही.' 


दुसऱ्या एका बाल साहित्यकाराने म्हटले आहे की, 'ही कविता मुलांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने पाहायला हवी. आपल्याला बालमनोविज्ञान समजून घेणे गरजेचे आहे.'


एका शिक्षण तज्ज्ञाच्या मते ही 'अतिशय दर्जाहीन कविता असून ती तत्काळ अभ्यासक्रमातून वगळली पाहिजे.' 


ही कविता कृष्णदेव शर्मा यांनी लिहीली आहे. ते बाल साहित्यकार आहेत. ते उत्तराखंडमध्ये बाल पत्रिकासुद्धा काढतात.