मुलीचा अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, धमकी दिली; त्यानंतर जे काही झालं...
Rajasthan Crime: मुलीचा अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला, नंतर व्हायरल करण्याची धमकी देऊन संबंध ठेवण्यास भाग पाडलं. त्यानंतर जे काही झालं...
Rajasthan Crime: कोणत्याही क्षणी मदतीला धावून येतात ते शेजारीपाजारी.. पण कोणाच्या मनात काय सुरू असेल सांगता येणार नाही. अशातच शेजाऱ्यांच्या नात्याला लाजवेल अशी घटना राजस्थानच्या (Rajastan Crime News) दौसामध्ये समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. (Obscene video made of girl taking bath threatened to viral What happened marathi Crime News)
बसवा पोलीस स्टेशन (Baswa Police Station) हद्दीतील एका गावात 24 वर्षीय तरुणी घरी आंघोळ करत असताना शेजारी राहणाऱ्या तरुणाने तिचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ (Video Of Girl Taking Bath) बनवला. अशी घटना दोन तीन वेळा झाली. एक दिवस तरुणी त्याला एकटी भेटल्यावर त्याने तरुणाने तिला व्हिडिओ दाखवला. व्हिडिओ पाहून तरुणी अस्वस्थ झाली आणि व्हिडिओ डिलीट करण्याची मागणी करू लागली.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. आरोपीने तिला अवैध संबंध ठेवण्यास भाग पाडलं. एकदा दोनदा नाही तर वारंवार ब्लॅकमेल (Blackmail the girl) करून आरोपीने पीडितेवर अनेकवेळा बलात्कार केला. अखेर जाचाला कंटाळून तरुणीने धाडसाचं पाऊल उचललं.
तरुणीने थेट पोलीस स्टेशन (Police Station) गाठलं अन् तक्रार दाखल केली. बसवा पोलिस ठाण्यात बलात्काराचा दुसरा गुन्हा तरुणीने नोंदवला. काही महिन्यांपूर्वी आरोपीने तिचा आंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि तिच्यावर अनेकांनी बलात्कार केला, असं तिने पोलिसांना सांगितलं.
दरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याची नोंद (Police Registered The Case) करून तपास सुरू केलाय. लवकरच दोन्ही गुन्ह्यांचा तपास पूर्ण करून आरोपींना न्यायालयात हाजीर करू, असं आश्वान बसवा पोलिसांनी पिडीत मुलीला दिलंय.