ओडिसा : बिहारच्या दशरथ मांझी यांच्याबद्दल अनेकांना माहिती असेल. पण ओडिशातील कंधमाल जिल्ह्यातील एका माऊंटनमॅनच्या कर्तृत्त्वाची बातमी समोर येत आहे. फुलबनी शहराच्या मुख्य मार्गापासून आपल्या गुमाशी गावाला जोडण्यासाठी १५ किलोमीटर लांब रस्त्यामध्ये डोंगर आड येत होता. 


रोज ८ तास



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामूळे त्याच्या मुलांना शाळेत ये-जा करण्यासाठी त्रास होत असे. म्हणून या माऊंटनमॅनने डोंगर फोडायला घेतलाय. जालंधर नायक असे त्याचे नाव असून तो रोज ८ तास मेहनत करतोय. 


गेल्या २ वर्षात आपल्या कठोर निश्चयामूळे जालंधरने ८ कि.मीचा रस्ता बनवला आहे. पुढच्या ३ वर्षात ७  कि.मी पर्यंतचा रस्ता बनविण्याचा त्याचा विचार आहे. 



शाळेत जायला अडचण 



'माझ्या ३ मुलांना शाळेत जाताना डोंगर पार करावा लागतो, हे पाहणे खूप दु:खदायक होते.यातूनच हातात चिनी आणि हातोडी घेण्याची प्रेरणा मिळाल्याचे' जालंधर सांगतात. 


गाव सोडून गेले


महत्त्वाची बाब म्हणजे जालंधर आणि त्याचे कुटुंबच या गावात राहते. गावातील इतर परिवार चांगला रस्ता आणि अन्य सुविधा नसल्याने गाव सोडून गेले .