भुवनेश्वर : सासू आणि सूनेचे नात हे अनेक वेळा वादग्रस्त असते. असाच एक प्रकार पुढे आलाय. दोघींमध्ये काहीतरी बिनसलं आणि चक्क सासूला रस्त्यावरून फरफटत नेताना एका सूनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना ओडिशातील बरगड जिल्ह्यातील तलपाली गावातील आहे. पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेतली असून सूनेला पोलिसांनी अटक केली आहे.