मुंबई : शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच काही ठिकाणी आधार कार्डची गरज आपल्याला भासते. त्यामुळे आधार कार्ड काळाची गरज बनले आहे. आधार कार्ड नसल्यास गैरसोय होते. तसेच शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे एका अर्थाने आधार बंधनकारकच झाले आहे. पण असेही काही नागरिक आहेत ज्यांच्याकडे आधार कार्डसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे नाहीत. त्यामुळे त्यांना निराधार राहावे लागते. जरी तुमच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसली, तरी देखील तुम्ही आधार कार्ड मिळवू शकता.


ही आहे अट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा, अर्जदाराकडे पुरेशी कागदपत्रे नसल्याने त्याला आधारसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतात किंवा आधारशिवाय राहावे लागते. आता यापासून मुक्तता मिळणार आहे. घरातील कुटुंबप्रमुखाच्या मदतीने तुम्हाला आधार कार्ड मिळू शकते. पण यासाठी कुटुंबप्रमुखाचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार केंद्रावर आपल्या कुटुंबप्रमुखासोबत गेल्यानंतर त्यांच्यासोबत असलेले नाते सिद्ध करावे लागेल. यानंतर तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे. ही प्रकिया करताना काही अडचण असल्यास, तुम्ही केंद्रावरील कर्मचाऱ्याची मदत घेऊ शकता. तसेच आधार कार्ड गहाळ झाल्यावर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच पुन्हा मूळ प्रत मिळवण्यासाठी अधिकचे पैसेदेखील मोजावे लागतात. आधार कार्ड गहाळ झाल्यास काळजी करण्याचे कारण नाही. नागरिकांसाठी युआयडीएआयने mAadhaar  मोबाईल अॅप लॉन्च केले आहे. हा अॅपच्यामदतीने तुम्ही तुमचे आधार कार्ड मोबाईलमध्ये ठेवू शकता. पण mAadhaar या अॅपचा वापर करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर हा नोंदणीकृत असणे गरजेचे आहे.


तुमचा मोबाईल नंबर आधारशी जोडलेला नसेल, तर आधार केंद्रावरुन नोंदणी करुन घेऊ शकता. या अॅपमध्ये क्यूआर कोड आणि इ-केवायसी असे दोन फिचर देण्यात आले आहेत. कोणत्याही ठिकाणावरुन तुम्ही या फिचरचा उपयोग आधार कार्ड प्रमाणेच करु शकता.


 mAadhaar अॅप


हे अॅप डाऊनलोड केल्यावर तुम्हाला आधार कार्ड सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे हे अॅप फायदेशीर आहे. हे अॅप डाऊनलोड करताना आवश्यक त्या माहितीची पूर्तता करावी लागणार आहे. यानंतर तु्म्हाला एक कोड तुमच्या मोबाईलवर मिळेल. या कोडची सत्यता तपासल्यानंतर या अॅपला मान्यता मिळेल. यामुळे बायोमेट्रिक (आधार कार्ड बनवताना शरीराच्या भागाचे दिलेले ठशांची ) माहिती लॉक अनलॉक करता येणार आहे.