मुंबई : बेरोजगार किंवा नोकरी बदलण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. जे युवक किंवा तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. Oil India Limited मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदांना भरपूर पगारही आहे. त्यामुळे तुम्ही जर अजूनही अर्ज केला नसेल तर आजच हा अर्ज करा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इच्छुक उमेदवारांनी oil-india.com या वेबसाईटला भेट द्या. तिथे जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे. Career Chemical Assistant Warden च्या माध्यमातून अर्ज करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करा. यामध्ये एकूण 28 रिक्त पदांसाठी भर्ती करण्यात येणार आहे. 


8 आणि 15 मार्च रोजी या पदांसाठी वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहेत. महिलांसाठी 3 तर केमिकल असिस्टंट पदासाठी 25 पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. वार्डनपदासाठी वयाची अट 35 ते 50 वर्ष देण्यात आली आहे. तर केमिकल असिस्टंट पदासाठी वयाची अट 18 ते 40 वर्ष करण्यात आली आहे. 


वॉर्डन (महिला) - उमेदवारांनी B.Sc. होम सायन्स पदवी किंवा हाउसकीपिंग/ केटरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. 
केमिकल असिस्टंट – उमेदवारांनी केमिकल सायन्समध्ये B.Sc असणे आवश्यक आहे. तसेच, संबंधित क्षेत्रातील 1 वर्षाचा अनुभव असावा.