नवी दिल्ली : ग्राहक ओलाच्या अॅपचा वापर करुन  सायकल बूक करून या सेवचा लाभ घेऊ शकतात.


पर्यावरण पूरक वाहतूक व्यवस्था


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत कारची सेवा देणारी ओला ही कंपनी आता सायकलची सेवाही पुरवणार आहे. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी ही सेवा दिली जाणार आहे. यातून ओला पर्यावरण पूरक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय देण्याचा प्रयत्न करतंय. यातून प्रदूषण, वाहतूक कोंडी यासारख्या प्रश्नांवर उत्तर शोधण्याचा ओलाचा प्रयत्न आहे.


सेवा कमी अंतरासाठी 


ही सेवा कमी अंतरासाठी परंतु पायी चालतांना लांब वाटणाऱ्या अंतरासाठी दिली जाणार आहे. उदाहरणार्थ, कॉलेज कॅम्पस, कार्यालय संकुल किंवा निवासी 
संकुलांमध्ये या सेवेचा वापर केला जाऊ शकतो.


लवकरच ग्राहकांच्या सेवेत


येत्या काही आठवड्यात ही सेवा पुरवली जाईल. परंतु कोणकोणत्या शहरात, कोणकोणत्या विभागात ही सेवा दिली जाणार आणि ग्राहकांना यासाठी किती पैसे मोजावे लागणार याबाबत मात्र ओलाकडून माहिती देण्यात आलेली नाही.