Couple Viral Video : आजकाल नातं प्रेमाचं असो किंवा लग्नाचं ते फार काळ टिकताना दिसत नाही. ब्रेकअप असो किंवा घटस्फोट यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामागील कारणं वेगवेगळी आहे, पण नाती काही महिन्यात असो किंवा अनेक वर्षांनी संपुष्टात येताना दिसत आहे. अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका वृद्ध जोडप्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 10 मिलियनपेक्षा व्ह्यूज मिळाले आहेत. या जोडप्याची कहाणी जाणून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. या जोडप्याचं खूप कौतुक होतं आहे. (old couple living in shimla from last 52 year instagram video viral trending now)


तुम्ही पाहिला का हृदयस्पर्शी व्हिडीओ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ अंशू या नेटकऱ्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शिमल्यामधील आहे. शिमल्याच्या डोंगराळ रस्त्यावर फिरताना एक वृद्ध जोडपे नेहमी प्रमाणे फिरत होतं. तेवढ्यात त्यांच्यावर अंशूची नजर त्या वृद्ध जोडप्यावर गेली. तेव्हा अंशूने फोटो काढत होता. त्याने या वृद्ध जोडप्याला विचारलं "फोटोग्राफी हा माझा छंद आहे, आणि मला फोटो काढण्यात मजा येते. तुम्ही दोघे एकत्र छान दिसाल. मी तुम्हा दोघांचे काही फोटो काढू शकतो का?" असं विचारल्यावर ते अवाक् झाले. 


यावर वृद्ध जोडप्याने त्याला विचारले की, तू काढलेले फोटो कुठे अपलोड करणार? मग त्याने त्याचं इन्स्टाग्रामचं अकाउंट दाखवलं. त्या अकाऊंटचं नाव @clickeranshu असं होतं. त्यानंतर दोघेही फोटोसाठी उभे राहिले. त्यानंतर त्याने त्या कपलचा काढलेला फोटो त्या आजी आजोबांना दाखवला. त्यावेळी त्यांच्यामध्ये संवाद झाला. त्याच ते म्हणाले त्यांच्या लग्नाला 52 वर्षे झाली आहेत. पुढे वृद्ध म्हणाली, ती दिल्लीची असून तिचा नवरा शिमलाचा ​​आहे. ते 52 वर्षांपासून शिमल्यात राहत आहेत. दोघांमधील प्रेम पाहून फोटोग्राफरने विचारले की तुम्हा दोघांचा लव्ह मॅरेज झाला होता का?  लव्ह मॅरेज नाही, तर अरेंज मॅरेज झालं आहे. त्या फोटोग्राफने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरही शेअर केला आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Anshu (@clickeranshu)


प्रत्येकाने पाहावा असा व्हिडीओ!


हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका यूजरने लिहिलंय, 'खूपच क्यूट कपल.' दुसर्‍या युजरनं लिहिलं की, '52 वर्षांचं एकत्र राहणं अप्रतिम आहे.' अजून एका यूजरने लिहिलंय की, 'विश्वास बसत नाही की आजही अशी लोक आपल्या आजूबाजूला आहेत.'