विकृतीपणाचा कळसच, वृद्ध व्यक्तीचा कुत्रीवर बलात्कार
प्राणीप्रेंमींनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करत आहेत.
राजस्थान : एका वृद्ध व्यक्तीने कुत्रीवरचं बलात्कार केल्याची किळसवाणी घटना घडलीय. प्रायव्हेट पार्टमधून रक्तबंबाळ अवस्थेत कुत्रीला फिरताना पाहून प्राणीप्रेमींनी कुत्रीला रूग्णालयात दाखल केले. रूग्णालयातील चाचणीत तिच्यासोबत गैरकृत्य झाल्याची माहिती मिळाली. प्राणीप्रेंमींनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करत आहेत.
राजस्थानच्या भरतपूरमधील कृष्णा कॉलनीत एका फिरत्या कुत्रीवर बलात्कार झाल्याची घटना घडलीय. कॉलनीतला वृद्ध व्यक्ती चंपालाल गुप्ता याने कुत्रीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मथुरा गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
कृष्णा कॉलनीत रहिवाश्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलनीत ही कुत्री फिरत राहते. कॉलनीतील सर्व लोक तीला काही ना काही खायला देत असतात. मात्र 2 दिवसांपूर्वी ती रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्याच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येत असल्याचे त्यांनी पाहिले. याची माहिती जिल्हा प्राणी क्रूरता प्रतिबंध समितीच्या सदस्यांना देण्यात आली.
जिल्हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक समितीच्या सदस्या कविता सिंग या प्रकरणावर म्हणाल्या की, कॉलनीतील रहिवाशांकडून माहिती मिळाली की, कुत्रीच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येत आहे, तर तिला कोणतीही इजा झालेली नाही. आम्ही तीला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले होते. तेथे उपचारादरम्यान पशुवैद्यकाने सांगितले की, कोणत्या तरी व्यक्तीने कुत्रीसोबत घाणेरडे कृत्य केले असल्याची माहीती दिली.
कविता सिंग पुढे म्हणाल्या की, गैरकृत्य करणाऱ्या आरोपींविरुद्ध आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करतायत.
पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार, आरोपी कुत्रीला जेवण देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून घाणेरडे कृत्य करायचा. तो अनेक दिवसांपासून कुत्रीसोबत असे घाणेरडे कृत्य करायचा, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आता गु्न्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.