एक हरणासाठी तब्बल 6 सिंहांमध्ये राडा, पण नक्की जिंकलं कोण?
शिकार एक दावेदार अनेक| शिकारीच्या भांडणात कोणी मारली बाजी व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा
नवी दिल्ली: सोशल मीडियावर शिकारीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी वाघ तर कधी सिंह शिकार करताना. नुकताच वाघ आणि अस्वलाच्या शिकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये अस्वलाने शिकरीला आलेल्या वाघावर उलट हल्ला करून त्याला पळवून लावलं. आता अजून एक शिकारीचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका हरणासाठी 6 सिंह भांडत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका हरणासाठी तब्बल 6 सिंह एकमेकांशी भांडत आहेत. हरीण कोणाला मिळणार यावरून त्यांच्यात झटापट सुरू आहे. एका शिकारीचे अनेक दावेदार असल्याने भांडण सुरू आहे. ही घटना कॅमेऱ्या कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दीड हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून मजेशीर कमेंट्स युझर्स करत आहे. एक युझर म्हणतो की ही घटना त्या दारूच्या ट्रकसारखी आहे. दारू पळवण्यासाठी जसे लोक भांडतात असे हे सिंह एकमेकांशी भांडत आहेत. शिकार एक दावेदार अनेक असं कॅप्शन देऊन हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.