मुंबई : खासगी बसमधून प्रवास करणाऱ्यांना काळानं रस्त्यातच गाठलं. दोन बसचा समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात 30 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बस अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ थरकाप उडवणारा आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, बस जात असताना समोरून एक बस आली आणि धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. 


हा अपघात एवढा भयंकर होता की बस ड्रायव्हर जागेवरून उडून दुसरीकडे फेकला गेला. त्यावरून धडक किती जोरात बसली असेल याचा अंदाज येऊ शकतो. या अपघातात 30 हून अधिक लोक जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. 


हा भीषण अपघात तमिळनाडूतील सलेम परिसरात ही भीषण दुर्घटना घडली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. काळजात धस्स करणारा हा व्हिडीओ आहे. नेमका अपघात कशामुळे झाला याचं कारण समजू शकलं नाही.