नवी दिल्ली : Omicron Pandemic​ : ओमायनक्रॉन या  (Omicron) घातक कोरोना व्हेरिएंटचा संसर्ग असलेल्या हाय रिस्क देशांमधून 37 विमाने भारतात दाखल झाली आहेत. (37 aircraft from high risk countries arrive in India) हाय रिस्क झोनमधून भारतात 7,976 प्रवासी आले आहेत. त्यापैकी विदेशातून आलेले 10 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर कर्नाटकमध्ये 5 जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा धोका वाढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई विमानतळावर लंडन, जर्मनीहून आलेले दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. 10 नोव्हेंबरपासून आतापर्यंत मुंबई विमानतळावर 485 जणांची टेस्ट झाली. त्यातील 9 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी केली जाणार आहे. तर कर्नाटकातल्या ओमायनक्रॉनबाधितांच्या संपर्कातील 5 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. या सर्वांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


30 नोव्हेंबरपासून मुंबईत परदेशातून येणाऱ्या सर्वांच्या विमानतळावर चाचण्या केल्या जात आहेत. तसेच पॉझिटिव्ह आलेले सर्वांच्या संपर्कात आलेल्यांना शोधून त्यांच्याही चाचण्या केल्या जात आहेत. गुरूवारपासून बीएमसीने 861 जणांच्या चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी 28 जण पॉझिटिव्ह आलेत. यातले 25 जण परदेशातून मुंबईत आलेत. तर तीन जण हे त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. यातले बहुतांश जण मुंबई पुणे आणि ठाणे जिल्ह्यातले आहेत.


मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी 



मुंबईत पुन्हा कोरोना रूग्ण वाढले आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका चिंतेत आहे. काल दिवसभरात 800 नवे रूग्ण सापडले आहेत. सध्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे मुंबईतही धोका वाढला आहे. मुंबई महापालिकेची आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. राज्यामध्ये ओमायक्रॉनचे तब्बल 28 संशयित रूग्ण आढळले आहेत. यातले सर्वाधिक 10 जण मुंबईत आहे. या सर्वांचे सँपल्स जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील आठवड्यात या सर्वांचे अहवाल येणार आहेत.