Omicron variant : भारतातील बहुतांश ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये `हे` समान लक्षण
कोरोना नियंत्रणात येत असताना आता ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे
Omicron variant symptoms : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने जगभरात दहशत पसरवली आहे. ओमायक्रॉनने भारतातही शिरकाव केला असून देशात आतापर्यंत 23 रुग्ण (Omnicron cases in india) आढळले आहे. ओमाक्रॉनच्या बहुतेक प्रकरणांमध्ये, सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. राजस्थानमध्ये ओमायक्रॉनची लागण झालेले सर्व रुग्ण एसिम्टोमैटिक (Omicron asymptomatic) म्हणजे त्यांच्यात कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. देशातील बहुतांश ओमायक्रॉन रुग्णांमध्ये हा समान धागा आहे.
तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
Omicron च्या सौम्य लक्षणांबद्दल शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. लक्षणं सौम्य असल्याने लोक चाचणी करण्यास पुढे येत नाहीत. तसंच ते विलगीकरणातही राहत नाहीत. काही लोकांना कोरोना झाला आहे हे देखील माहित नसतं. त्यामुळे ओमायक्रॉनचा वेगाने प्रसार होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासानुसार ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सर्दी-खोकल्या सारखी सामान्य लक्षणं आढळली आहेत. त्यांना श्वास घेण्यासारख्या समस्याही जाणवत नाहीत. पण सौम्य लक्षण असलेल्या व्यक्तीच्या माध्यमातून कोरोना वेगाने पसरु शकतो.
ओमिक्रॉनच्या रुग्णाला नाक वाहणे आणि घसा खवखवण्याशिवाय इतर कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचं एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक सुरेश कुमार यांनी म्हटलं आहे. बहुतेक रुग्ण लक्षणं नसलेली असतात.
महाराष्ट्रातील पहिल्या ओमायक्रॉन रुग्णाचा कोरोना अहवालही निगेटिव्ह आला आहे. 33 वर्षीय रुग्ण हा व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनिअर आहे आणि त्याला ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितलं की, रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्याला 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.