मुंबई : Omicron Infection in india : देशाच्या चिंतेत टाकणारी बातमी. जगात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होत असताना आता भारतातही कोरोनाचा धोका वाढला आहे. देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत भर पडत होत आहे. देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 87 वर पोहोचला आहे. (Omicron cases in India rise to 87 after 10 new cases reported)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरातल्या ओमायक्रॉनबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली आणि  गुजरातमध्ये काल एका दिवसात 14 रुग्ण वाढले. तर इकडे महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सध्या 32 रुग्ण आहेत. तर त्या खालोखाल राजस्थानात 17 ओमायक्रॉन बाधित आहेत. 


देशभरात गुरुवारी सुमारे 8 हजार कोरोनारुग्ण वाढले आहेत. तर अॅक्टिव्ह रुग्ण 87हजार झाले आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी आढावा घेतला. केंद्रशासीत प्रदेशातल्या आरोग्यसुविधांचीही माहिती घेतली.