लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाचा खरा चेहरा समोर, अखरे 7 जणांवर गुन्हा दाखल
थाना पुवायन अंतर्गत गावात राहणाऱ्या मुलीचे लग्न तिच्या नातेवाईकांनी शाहजहानपूर येथील रहिवासी सत्यमशी लग्न केलं होतं
मुंबई : प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो. कारण यामुळे तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात होत असते. परंतु एक अशी बातमी समोर आली आहे, ज्यामध्ये तुम्ही लग्नानंतर एका मुलीचं आयुष्य पूर्ण बदललं. एवढंच काय तर तिच्यासमोर तिच्या नवऱ्याचा असा चेहरा आला, ज्यामुळे तिला खूप मोठा धक्का बसला. यूपीच्या शाहजहांपूर जिल्ह्यातील पुवायन पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणीची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीसह सात जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.
खरंतर १० लाख रुपये हुंडा देऊन शाहजहानपूरच्या मुलीचे कुटुंबीयांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले. परंतु लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूसमोर नवरदेवाचा खरा चेहरा समोर आला. ज्यामुळे तिने हे लग्न तोडलं.
पोलिस अधीक्षक यांनी सांगितले की, थाना पुवायन अंतर्गत गावात राहणाऱ्या मुलीचे लग्न तिच्या नातेवाईकांनी शाहजहानपूर येथील रहिवासी सत्यमशी लग्न केलं होतं आणि तिच्या लग्नात 10 लाख रुपये रोख हुंडा दिला होता. नवरी निघून सासरच्या घरी पोहोचली.
परंतु लग्नाच्या पहिल्याच रात्री आपला नवरा नपुंसक असल्याचं नवरीला कळलं. नवरीने हा प्रकार सासरच्या मंडळींना सांगितल्यावर त्यांनी नववधूला मारहाण केली. तसेच त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
ज्यामुळे यामुलीने अखेर आपल्या माहेरच्यांच्या मदतीने पोलिसात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.