Another mid-air 'peeing' incident : न्यूयॉर्क - दिल्ली एअर इंडियामधील किळसवाणा प्रकाराची घटना ताजी असताना पुन्हा एकदा धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेच्या 10 दिवसांनंतर पॅरिस - दिल्ली विमानात ( Delhi Paris flight) मद्यधुंद प्रवाशाने हद्दच पार केली. या विमान प्रवासादरम्यान मद्यधुंद (alcohol) प्रवाशाने महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवर लघवी केली. ही घटना 6 डिसेंबर रोजी एअर इंडियाच्या (Air-India flight) 142 या नंबरच्या फ्लाइटमध्ये (Air India flight 142) घडली आहे. 


घाणेरडे कृत्य!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार 6 डिसेंबर 2022 मध्ये सकाळी 9.40 वाजता एअर इंडियाचं विमान दिल्ली विमानतळावर उतरलं. या विमानात एक पुरुष प्रवासी मद्यधुंद  (drunk man) अवस्थेत होता. हा प्रवासी केबिन क्रूच्या सूचनांचं पालनही करत नव्हता. त्या प्रवाशाला आपण काय करतो आहे याचं भान नव्हतं. अशातच त्याने शेजारी असलेल्या महिला प्रवाशाच्या ब्लँकेटवरच लघवी (urinated on the blanket of a female co-passenger) केली. या घटनेनंतर या प्रवाशाला दिल्लीत सीआरपीएफने अटक केली. मात्र त्याने लेखी माफी मागल्यामुळे या प्रवाशाला सोडण्यात आलं. 


यापूर्वीही घडली अशी घटना!


या घटनेपूर्वी 26 नोव्हेंबरलाही अशी घाणेरडी घटना समोर आली होती. न्यूयॉर्क  - दिल्ली फ्लाइटमध्येही (New York To Delhi Flight) अशीच घटना घडली होती. ती घटनादेखील एअर इंडिया कंपनीच्याच विमानात घडली. या घटनेत एका मद्यधुंद व्यक्तीने सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघवी केली. या प्रकरणी देखील गुन्हाची नोंद करण्यात आली आहे. या मद्यधुंद व्यक्तीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 509 आणि 510 या कलमातर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Once again Another mid-air peeing incident  drunk man urinates on woman blanket on air india)



मात्र ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा त्या प्रवाशावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे संतापलेल्या पीडित महिलेने थेट टाटा ग्रुपचे चेअरमन एन चंद्रशेखरन (N Chandrasekaran) यांना पत्र पाठवलं. त्यानंतर या प्रकरणाची गंभीरस्वरुपाने तपासणी करण्यात आली. फ्लाइटच्या बिझनेस क्लासमध्ये हा प्रकार घडला आहे. एवढं नाही तर मुंबईकरांचं नाव या प्रवाशाने धुळीस मिळलं आहे. कारण हा प्रवासी मुंबईतील रहिवासी (Mumbai resident) असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान एअर इंडियाने मुंबईतील माणसाला 30 दिवसांच्या कालावधीसाठी एअरलाइन्ससोबत उड्डाण करण्यास बंदी घातली आहे.