Lift Accident in Chutiya Ranchi : झारखंडमध्ये (jharkhand)  एक भयानक दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.  बटन दाबलं दरवाजा उघडला पण लिफ्ट आलीच नाही. यामुळे तो मुलगा थेट 11 मजल्यावरुन पडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चुटिया पोलीस स्टेशन हद्दीतील अनंतपूर येथे हा अपघात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शैलेश कुमार श्रीवास्तव असे मृत तरुणाचे नाव आहे. शैलेश कुमार श्रीवास्तव हे अनंतपूरमधील समृद्धी एन्क्लेव्हमध्ये राहत होते.  शुक्रवारी ते चौथ्या मजल्यावरून तळमजल्यावर जाण्यासाठी लिफ्टबाहेर उभे होते. त्यांनी लिफ्टचे बटण दाबले. लिफ्ट वर आली दरवाजा उघडला. शैलेश लिफ्टच्या आत गेले पण ते चौथ्या मजल्यावरुन थेट चार मजले खाली कोसळले. 


आतमध्ये लिफ्टच नव्हती


शैलेश कुमार श्रीवास्तव  यांनी चौथ्या मजल्यावर लिफ्ट बोलावली. लिफ्टच्या इंडीकेटरवर लिफ्ट आल्याचे दाखवले. पण, आत मध्ये लिफ्टच नव्हती. शैलेश कुमार श्रीवास्तव  यांनी चौथ्या मजल्यावर लिफ्टचा दरवाजा उघडला पण, आत मध्ये लिफ्ट आहे की नाही हे पाहिलेच नाही. त्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला. मात्र, आत लिफ्टच नव्हती. शैलेश कुमार श्रीवास्तव हे चौथ्या मजल्यावरुन थेट खाली कोसळले. 


काही कोसळल्याचा आवाज ऐकून लोक जमले


लिफ्टमधून काही तरी कोसळल्याचा आवाज ऐकून सोसायटीत राहणारे सर्व जण लिफ्टजवळ जमा झाले. लिफ्टचा दरवाजा उघडून पाहिले असता आत मध्ये शैलेश कुमार श्रीवास्तव गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


पोलिसांकडून गुन्हा दाखल


या घटने प्रकरणी  चुटिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिफ्ट मध्ये काही तांत्रिक बिघाड आहे? लिफ्ट नादुरुस्त होती का? या प्रकरणात कोण दोषी आहे. याचा तपास पोलिस करत असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


राजस्थानमध्येही घडली होती अशीच घटना


गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये राजस्थानच्या जयपूरमध्येही अशीच भयानक घटना घडली होती. जयपूरमधील अजमेर रोडवरील माई हवेली अपार्टमेंटमध्ये थेट 11 मजल्यावरुन पडून एका इंजीनियरींगच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. 11व्या मजल्यावरून खाली उतरण्यासाठी लिफ्टचे बटण दाबले. लिफ्टचा दरवाजा उघडला, पण लिफ्ट आली नाही. दरवाजा उघडल्यानंतर कुशाग्रने आत पाऊल टाकले. मात्र, आतमध्ये लिफ्टच नव्हती. यामुळे तो थेट 11व्या मजल्यावरून खाली पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.