नवी दिल्ली : भारत-पाक सीमेवर राजस्थानमध्ये जैसलमेर येथे आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी एका संशयिताला अटक केली आहे. या संशयिताची कसून चौकशी केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रविवार रात्री सीमा सुरक्षा दलाने पोस्ट आरडी 231 जवळ एका संशयिताला अटक केली. लखवीर खिरास असं त्याचं नाव असल्याचं त्याने सांगितलं आहे.

 

संशयित पंजाबमधील फरीदकोट जिल्ह्याचा राहणार आहे. या संशयिताकडे कोणतीही वस्तू नाही मिळाली. पण विविध सुरक्षा विभाग याची चौकशी करत आहे.