मुंबई : दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्यूत्तर देणारे भारतीय सैन्य दहशतवाद्यांना सरेंडर करण्यासाठी देखील भाग पाडत आहेत. शुक्रवारी दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील हंजीपोरा येथो अशीचं एक घटना घडली आहे. ज्यामध्ये भारतीय सैन्यांपुढे एका दहशतवाद्याने सरेंडर केलं. जवानांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, हंजीपोरा भागात सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता आणि त्याचा साथीदार लपून बसला होता. त्या लपून बसलेल्या दहशतवाद्याला बाहेर काढण्यासाठी भारतीय जवांनानी भावूक भावनांचा आधार घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तुला काही झालं तर तुझ्या कुटुंबाचं काय होईल'  असं म्हणत भारतीय जवानांनी दहशतवाद्याला सरेंडर करण्यास सांगितलं. ज्यानंतर दहशतवाद्याने एके-56 रायफलसोबत सरेंडर केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Taiba)च्या दहशतवाद्यांबद्दल माहिती मिळाल्यानंतर  भारतीय जवानांनी शोध मोहिम सुरू केली. 



ज्या ठिकाणी दहशदवादी असल्याची माहिती जवानांना मिळाली, दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणी सुरक्षा दलाच्या पोहोचताच, त्यांनी गोळीबार करण्यास सुरूवात केली. त्यानंतर भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा मृत्यू झाला असून एक लपून बसाला होता. तेव्हा लपून बसलेल्या दहशतवाद्याला भारतीय जवानांनी सरेंडर करण्यास सांगितलं. 


जवानांनी दहशतवाद्याला सांगितलं, 'स्वतःच्या घराबद्दल विचार कर. तुझ्या मित्रासोबत काय झालं त्याचा विचार कर. तुझ्यानंतर तुझ्या कुटुंबाचं काय होईल.' अशा भावूक भावनांचा आधार घेत भारतीय  जवानांनी दहशतवाद्यास सरेंडर करण्यासाठी भाग पाडलं आणि त्याने सरेंडर देखील केलं.