मदुराई : तामिळनाडूतील मदुराईत कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला आहे. एनएनआयने हे वृत्त दिलं आहे. मदुराईतील मुर्थी नावाचे जे कांदे विक्रेत आहेत, ते म्हणतात जे ग्राहक ५ किलो कांदा विकत घेत होते, ते आता फक्त १ किलो कांदा घेतात. कारण कांद्याचे भावच तेवढे वाढले आहेत, ज्या भावाने सहज खरेदी करणं शक्य होत नाही. कांदा खरेदी करणारी महिला जया शुभा असं म्हणतात की, एका आठड्यात माझे ३५० ते ४०० रूपये कांदा खरेदीवर खर्च होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिवृष्टीमुळे कांदापिकाचं फार मोठं नुकसान झालं आहे, भारतात ज्या ठिकाणी कांद्याचं पिक घेतलं जातं त्या ठिकाणी योग्य वातावरण नसल्याने कांद्याचे भाव कुठल्या कुठे गेले आहेत. महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांद्याचं पिक घेतलं जातं.


सुरूवातीच्या टप्प्यात कांद्याचं बियाणं उगवणे, रोप तयार करणे ही फारच नाजूक प्रक्रिया आहे, यात जोराचा पाऊस, किंवा धूकं आलं तरी कांद्याचं पिक मोठ्या प्रमाणात प्रभावित होतं.



कांद्याच्या तुटवड्याची परिस्थित ही मार्च महिन्यापर्यंत असणार आहे, असा अंदाज आहे, मात्र त्यानंतर बाजारात आणखी मोठ्या प्रमाणात कांदा येणार आहे, कारण कांद्याचे भाव वाढल्याने शेतकरी वर्ग कांदा पिक जास्त घेण्यावर भर देत आहे.