नवी दिल्ली : कांद्याची किंमत ५० रुपये किलोपर्यंत येऊ शकते. NAFED  नोव्हेंबर २०२० पर्यंत १५ हजार टन कांद्याची पूर्तता करण्यासाठी शनिवारपर्यंत आयात करणाऱ्यांकडून बोली मागवण्यात आलीय. देशातील कांद्याच्या वाढत्या किंमतीवर अंकूश ठेवण्यासाठी बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढण्यासाठी ही पाऊलं उचलली जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

NAFED ने नोव्हेंबर २०२० पर्यंत कोणत्याही देशातील ४० ते ६० मिलीमीटर आकाराचा लाल कांद्याच्या पूर्ततेसाठी Bid काढण्यात आली आहे. या कांद्याची किंमत ५० रुपये प्रति किलोपर्यंत असेल. 


Bid नुसार आयातक किमान २ हजार टन पुरवठा करण्यासाठी बोली लावू शकतात. ते बर्‍याच ५०० टनांमध्ये उपलब्ध करुन दिले जाऊ शकतात. यासाठी आयातदार ४ नोव्हेंबरपर्यंत निविदा सादर करु शकतात. कांदला बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदरात आयातदारांना कांद्याचा पुरवठा करावा लागणार आहे.



१५ हजार टन लाल कांदा आयात करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे देशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा वाढण्यास मदत होईल असे नाफेडचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक एसके सिंग यांनी सांगितले. 
 
मूल्यमापन, गुणवत्ता आणि वेगवान वितरण तारखेच्या आधारे मूल्यांकन केले जाईल. निविदाकारांना ताजे, चांगले वाळलेले आणि रोग-मुक्त कांदे द्यावे लागतील.


कांद्याचे दर नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी केंद्र सरकारने किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत साठा मर्यादा लागू केली आहे. किरकोळ विक्रेते केवळ दोन टन पर्यंत कांदे साठवू शकतात, तर घाऊक विक्रेत्यांना 25 टन पर्यंत ठेवण्याची परवानगी आहे.


कांद्याचे दर रोखण्यासाठी सरकारला आवश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा लागू करावा लागला जो गेल्या महिन्यातच संसदेत मंजूर झाला होता. या कायद्यामुळे सरकारला भाववाढ झाल्यास नाशवंत वस्तूंचे नियमन करण्याची परवानगी आहे.