नवी दिल्ली : सध्या कांद्याचे वाढते दर (Onion Price) सामान्यांना चांगलेच रडवत आहेत. राजधानी दिल्लीतील आजादपूर बाजारात  (Azadpur Market)  कांद्याचा घाऊक भाव ५० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. हा भाव २०१५ नंतर सर्वाधिक आहे. आशियातील सर्वात मोठा कांद्याचा बाजार महाराष्ट्रातील लासलगांवमध्ये भरतो. येथेही कांदा ५० रुपये प्रति किलो विकला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बाजारामध्ये आवक कमी होत आहे. आवक कमी झाल्यामुळे कांद्याचे दर वाढत असल्याचे व्यापारांनी सांगितले आहे. मात्र, असे असले तरी शेतकऱ्याला कमी भावात कांदा बाजारात घालावा लागत आहे. दिल्लीतील आजादपूर बाजाराचे व्यापारी आणि कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा यांनी सांगितले, दक्षिण भारतातील राज्यांत मुसळधार पावसामुळे कांद्याचे पीक खराब झाले आणि नवीन पीक तयार होण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने कांद्यांच्या किंमतीत वाढ होत आहे.


कांद्याची किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने, गेल्या आठवड्यात आपली किमान निर्यात किंमत म्हणजेच एमइपी ८५० डॉलर प्रति टन निश्चित केली. जेणेकरून निर्यातीवरील बंदीमुळे देशातील बाजारात कांद्याचा पुरवठा कमी होणार नाही. परदेशी व्यापार महासंचालक (DGFT) १३ सप्टेंबरच्या सूचनेनुसार, यासंदर्भात पुढील आदेश येईपर्यंत, कांद्याची किमान निर्यात किंमत ८५० डॉलर प्रति टनहून कमी दरात निर्यातीसाठी परवानगी देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.


दरम्यान, केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयात करण्याचे धोरण अवलंबले होते. जेणेकरुन कांदाचा भाव नियंत्रणात राहिल. मात्र, कांद्याचा दर आता प्रति किलो ५० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे सामान्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे.