मुंबई : क्रिकेट विश्वात सध्या टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) खेळवला जात आहे. या वर्ल्ड कपवर देशातील अनेक ठिकाणांहून सट्टा लावला जात आहे. या प्रकरणी सट्टेबाजांना (bookies) पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्याही घटना देशभरातून समोर आल्या आहेत. देशात सट्टेबाजी करणे कायद्याने गुन्हा असला तरी अजूनही बिनदिक्कतपणे सट्टेबाजी सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणावर आळा घालण्यासाठी सरकार (Government) आता कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीला लागली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात सट्टा लावणे (Online Betting) कायद्याने गुन्हा (crime) असला तरी सर्रास सट्टा खेळला जातो. मग तो टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup)  असो, वनडे वर्ल्ड कप असो अथवा आयपीएल. या क्रिकेट स्पर्धेत बिनदिक्कतपणे सट्टेबाज (bookies) मॅचच्या टॉसपासून शेवटच्या बॉलपर्यंत सट्टा लावत असतात. या प्रकरणी अनेकदा सट्टेबाजांना अटकही करण्यात आली आहे. मात्र तरीही सट्टेबाजी बिनधास्त सुरू आहे.  


सट्टेबाजाचा बाजार किती?


देशात क्रिकेटच्या मोसमात कोट्यवधींचा सट्टा लावला जातो. वेगवेगळ्या अहवालानुसार भारतातील सट्टेबाजीचा (bookies) बाजार 10 लाख कोटींच्या पुढे गेला असल्याची माहिती आहेत. त्यात आता अवैध ऑनलाइन सट्टेबाजीमुळे (Online Betting) तर सट्टेबाजांना पकडणे देखील कठीण झाले आहे. या ऑनलाइन सट्टेबाजीत आता कोणीही कुठेही बसून सट्टा लावू शकतो.त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे. 


10 लाख कोटींची बाजारपेठ


दोहाच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर स्पोर्ट सिक्युरिटीने 2016 मध्ये एका अहवालात म्हटले होते की, बेकायदेशीर सट्टेबाजीचा (illegal Betting)  व्यवसाय त्यावेळी 150 अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे 10 लाख कोटी रुपयांचा होता. त्याचवेळी, जस्टिल लोढा समितीने सांगितले की, भारताचा सट्टा बाजार त्यावेळी सुमारे 82 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 6 लाख कोटी पर्यंत होता. मात्र आताही बाजारपेठ आणखीणच वाढली असणार आहे. 


ऑनलाईन सट्टेबाजी वाढतेय 


देशात ऑनलाईन सट्टेबाजी (Online Betting) वाढत चालली आहे. सध्या वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापर, जलद इंटरनेट, परवडणारे स्मार्टफोनमुळे सट्टेबाजीला ऊत आला आहे. तसेच देशातील वाढता तंत्रज्ञानाचा वापर पाहुन काही परदेशी कंपन्यांनी टेलिव्हिजन आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील सट्टेबाजीची जाहीरात करण्यास सुरुवात केली आहे. 


तसेच नुकतेच सरकारच्या निदर्शनास आले आहे की अनेक क्रीडा चॅनेल अलीकडे परदेशी ऑनलाइन सट्टेबाजी (Online Betting) प्लॅटफॉर्म तसेच त्यांच्या सरोगेट न्यूज वेबसाइट्सच्या जाहिराती दाखवत आहेत.  Fairplay, Parimatch, Betway, Wolf 777 आणि 1xbet सारख्या ऑफशोअर बेटिंग प्लॅटफॉर्मवरून जाहिराती करण्यात येत आहेत. सरोगेट न्यूज वेबसाइट्सचे लोगो हे बेटिंग प्लॅटफॉर्मसारखेच असतात.


दंडात्मक कारवाईचा इशारा


सरकारने 3 ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये असे सांगण्यात आले होते की, ऑनलाइन सट्टेबाजीच्या (Online Betting)  जाहिराती बंद केल्या जात नाहीत. सरकारने नाव घेऊन सांगितले की, सट्टेबाजीच्या जाहिराती देशाबाहेरून प्रसारित केल्या जात आहेत. हे थांबवले नाही, तर सरकार दंडात्मक कारवाईही करू शकते, असा इशाराही दिला. मात्र तरीही जाहिराती सुरुच आहेत.


...तर अर्थव्यवस्था मजबूत होईल


फेडरेशन ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) ने 2019 मध्ये एका अहवालात एकूण सट्टा बाजार सुमारे $ 41 अब्ज म्हणजेच 3 लाख कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. या अहवालात असे म्हटले होते की, जर या क्षेत्राचे योग्य कायदेशीर नियमन झाले तर भारताला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळू शकतो.


देशात सट्टेबाजांना (Online Betting) अटक करून सुद्धा ऑनलाइन सट्टेबाजीने अधिक वेग धारण केला आहे. देशाबाहेरून कार्यरत असलेले अनेक ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्म भारतात त्यांचा व्यवसाय चालवत आहेत. या  प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या वेळी अनेक सूचनाही जारी केल्या आहेत. मात्र तरीही सट्टेबाजी काही आटोक्यात आली नाही आहे. त्यामुळे आता  गेल्या काही महिन्यांत ईडीने हे ऑफशोर ऑनलाइन सट्टेबाजी चालवणाऱ्या अनेक कंपन्यांवर छापे टाकायला सुरुवात केली आहे. जर तरीही ऑनलाईन सट्टेबाजी नियंत्रणाल आली नाही तर सरकार कठोर पाऊल उचलण्याची तयारी करत आहे.