लॉकडाऊनमध्ये घरबसल्या करा कमाई, लोकांना द्या हा सल्ला
कंपन्यांतर्फे अशी अनेक कामं आहेत जी घरबसल्या देखील करु शकता
नवी दिल्ली : तुमच्या मित्रपरिवारात असे अनेकजण असतील जे घरी राहून आपल्या गरजा पूर्ण करतात. हे कसं शक्य आहे ? असा प्रश्न आपल्या मनात येतो. पण कंपन्यांतर्फे अशी अनेक कामं आहेत जी घरबसल्या देखील तुम्हाला करता येऊ शकतील.
भारतामध्ये डिजीटल इंडीयाचे वारे जोरात वाहत आहेत. इंटरनेट तर सर्वांच्याच आयुष्याचा एक भाग बनला आहे. इंटरनेटमुळे काही लोकांचं मनोरंजन होतंय तर काहीजणांना रोजगार मिळतोय. अनेकांची कामं यामुळे सोपी झाली आहेत. लॉकडाऊनमध्ये घरी बसून काम करण्याची संधी लोकांसमोर उपलब्ध झाली आहे. अशी अनेक कामं आहेत जी तुम्ही घरबसल्या करु शकता.
लॉकडाऊनमध्ये स्टॉक मार्केट सतत हेलकावे घेत आहे. अशावेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे ही लोकांची गरज बनली आहे. आपण जिथे पैसे गुंतवू तिथे आपला पैसा सुरक्षित राहावा आणि सोबत चांगले रिटर्न्स देखील मिळावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते.
तुम्ही वैयक्तिक गुंतवणूक सल्लागार बनून लोकांची या कामात मदत करु शकता. या बदल्यात फीस घेऊन पैसे कमाऊ शकता. हे असे काम आहे जे तुम्ही कुठे राहुनही करु शकता.
यासाठी तुमच्याकडे कॉम्युटर असणं गरजेचं आहे. तुमचं ऑफिस उघडून कंपन्यांसाठी काम करु शकता. यामध्ये तुम्हाला कस्टमरला भेटणं, प्रवास करणं आणि कॉन्फरन्स कराव्या लागतात. याशिवाय फायनांशियल कंपन्या ऑनलाईन काम देतात.
वैयक्तिक गुंतवणूक सल्लागार हे काम सुरु करण्यासाठी तुमच्याकडे प्रोफेशनल डीग्री असणं गरजेचे आहे. चांगल्या क्रिएटीव्ह आयडीयावर हे काम अधिक चांगल्याप्रकारे करता येते.
ऑनलाईन अकाऊंटंट
ऑनलाईन अकाऊंटंटच्या कामाला देखील सध्या खूप मागणी आहे. तुमचं कार्यालय उघडून कंपन्यांसोबत भागीदारी करुन त्यांचे अकाऊंट्स हॅंडल करता येऊ शकतात. घरबसल्या तुम्ही कंपनीचे अकाऊंट ऑनलाईन संभाळू शकताय या बदल्यात तुम्ही १५ ते २० हजार दरमहा कमाऊ शकता.