Online Scam: ऑनलाईन साईटवरून एखादी महागडी इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवताना धाकधूक होते. कारण गेल्या काही दिवसात ऑनलाईन वस्तू मागितल्यानंतर साबण, बटाटे यासारख्या वस्तू येत असल्याने भीती वाढली आहे. त्यामुळे महागडी वस्तू घेताना थेट दुकानात जाऊन घेणं लोकं पसंत करतात. पण ऑनलाईन शॉपिंग करताना असं का होतं? असा प्रश्न अनेकांना पडतो. लोकल सेलर्सच्या बेजबाबदारपणामुळे अशा घटना घडत असताता. कंपनी आपल्या ग्राहकांना कधीच त्रास देत नाहीत. या उलट अशा घटनांना लगाम लावण्यासाठी प्रयत्नशील असतात. यासाठी कंपनीने एक नवी पद्धत अवलंबली आहे. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक टाळता येऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओपन बॉक्स डिलीव्हरीबाबत तुम्ही ऐकलं आहे का? नुकतीच ही पद्धत सुरू करण्यात आली आहे.  ऑनलाईन फसवणूक होऊ नये यासाठी ही संकल्पना राबण्यात येत आहे. वास्तविक, तुम्हाला कुरिअर डिलिव्हरी केल्यानंतर, डिलिव्हरी एजंट स्वतः पॅकेज उघडतो आणि प्रोडक्ट अनबॉक्स करतो. तुमच्या प्रोडक्टमध्ये काही समस्या असल्यास, तुम्ही उत्पादन घेण्यास नकार देऊ शकता कारण ती पुन्हा डिलिव्हरी एजंटची जबाबदारी आहे आणि कंपनी तुम्हाला त्या बदल्यात दुसरे प्रोडक्ट पाठवते.


पण ही सेटिंग आवश्यक आहे


तुम्ही ही सेटिंग सिलेक्ट केली असेल तरच तुम्हाला ओपन बॉक्स डिलिव्हरीचा लाभ मिळेल. जर तुम्ही ओपनबॉक्स डिलिव्हरी सेटिंग निवडली नसेल, तर डिलिव्हरी एजंट तुम्हाला ओपन करून पॅकेज दाखवेल आणि त्यानंतर काही अडचण आल्यास ती जबाबदारी तुमची असणार आहे. तुम्हाला अॅपच्या माध्यमातून ती वस्तू परत करता येईल किंवा पैसे परत मागू शकता. 


रणरणत्या वाळवंटात खदानीतून निघालेल्या मालगाडीत Honeymoon! या मागचं कारण वाचून व्हाल हैराण


तुम्ही एखादी महागडी वस्तू मागवल्यानंतर ओपन बॉक्स डिलिव्हरी पर्याय जरूर निवडा. कारण त्या वस्तूत काही दोष आढळल्यास परतावा आणि रिफंडसाठी खूप हेलपाटे मारावे लागतील. हा त्रास होऊ नये यासाठी, तुम्ही नेहमी ओपन बॉक्स डिलिव्हरी पर्याय निवडावा.