रणरणत्या वाळवंटात खदानीतून निघालेल्या मालगाडीत Honeymoon! या मागचं कारण वाचून व्हाल हैराण

साखरपुडा, लग्न कायम स्मरणात राहावं यासाठी नवनवे ट्रेंड आले आहेत. प्री वेडिंग शूटपासून हानिमून डेस्टन्सीपर्यंत नियोजन केलं जातं. यासाठी कोणती थीम, जागा निवडतील हे सांगता येत नाही.

Updated: Oct 2, 2022, 01:55 PM IST
रणरणत्या वाळवंटात खदानीतून निघालेल्या मालगाडीत Honeymoon! या मागचं कारण वाचून व्हाल हैराण title=

Latest Trending News: साखरपुडा, लग्न कायम स्मरणात राहावं यासाठी नवनवे ट्रेंड आले आहेत. प्री वेडिंग शूटपासून हानिमून डेस्टन्सीपर्यंत नियोजन केलं जातं. यासाठी कोणती थीम, जागा निवडतील हे सांगता येत नाही. इतरांपेक्षा वेगळं काही तरी करण्याच्या नादात कोण काय करेल सांगता येत नाही. यासाठी जोडपं सर्वोत्तम जागा निवडतात. मात्र क्रोएशियातील एका नवविवाहित जोडप्याने हानिमूनसाठी निवडलेली जागा (Honeymoon Destination) पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या हानिमूनची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा रंगली आहे. दोघांनी युरोप, आशिया, अमेरिका यासह सर्व खंडांतील किमान 150 ठिकाणी प्रवास केला आहे. असे असूनही त्यांनी असे ठिकाण का निवडले? यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

रिपोर्टनुसार, क्रिस्टिजन आणि आंद्रिया इलिसिक यांनी दीर्घ रिलेशनशिपनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. रिलेशनशिपमध्ये असताना त्यांनी अनेक ठिकाणी पाहिली होती. लग्नानंतर जेव्हा हनिमूनला जाण्याची वेळ आली तेव्हा तिने निवडलेली जागा सर्वांनाच आश्चर्यचकित करून गेली. या दोघांनी त्यांच्या हनीमूनसाठी वायव्य आफ्रिकेतील मॉरिटानियाच्या अत्यंत उष्ण वाळवंटात लोहखनिजाने भरलेली एक मालवाहू ट्रेन निवडली. या हनीमूनचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

बेडकांची संख्या कमी झाल्यास माणूस आजारी पडत राहणार! अभ्यासात धक्कादायक खुलासा

क्रिस्टिजनने सांगितले की, त्याला लग्नानंतरचे शूट खास बनवायचे होते. प्रत्येकजण हनिमूनसाठी सुंदर ठिकाणी जातो. परंतु आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं. यासाठी मॉरिटानिया वाळवंटाची निवड केली. यावेळी लोहखनिजाने भरलेल्या मालवाहू ट्रेनवर फोटोशूट केले. हनिमूनसाठी निवडलेली मालगाडी मॉरिटानियाच्या जौरात येथून अटलांटिक महासागराच्या काठावर वसलेल्या नौआदिबू बंदराकडे जात होती. मालगाडीला किमान 700 किमी अंतर कापायचे होते. त्याचा संपूर्ण मार्ग वाळवंटातून जातो.