शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नावर विद्यार्थानं दिलं विचित्र उत्तर, फोटो व्हायरल
या फोटोमध्ये एका विद्यार्थाने शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
मुंबई : जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या साथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून लोक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. तसेच कोरोनामुळे लहान मुले बराच काळ शाळेत देखील गेले नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर शाळा उघडल्या खऱ्या, पण या ना त्या कारणामुळे त्या बंद कराव्या लागल्या. त्यात आता पुन्हा एकदा कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहाता शाळा बंद करण्यात आल्या आणि निर्बंध देखील कठोर करण्यात आले. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेसचा आधार घ्यावा लागत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक फोटो खूप व्हायरल होत आहे, या फोटोमध्ये एका विद्यार्थाने शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. जे वाचून तुम्हाला तुमचं हसू आवरनार नाही.
सोशल मीडियावर मुलाने कागदावर लिहिलेल्या उत्तराचा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. जे पाहून सर्वांचेच मनोरंजन होतोय. अनेकांना तर या मुलाचं उत्तर इतकं आवडले आहे की, त्यांनी या फोटोला शेअर देखील केलं आहे.
आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे.
खरेतर एका विज्ञान शिक्षकाने विद्यार्थ्यांना न सांगता त्यांची सरप्राईज टेस्ट घेतली होती. त्यावेळे शिक्षकांच्या प्रश्नाला त्या विद्यार्थ्यांने जबरदस्त उत्तर दिलं आहे, ज्याला कोणतीही तोड नाही. त्यामुलाने ज्या पद्धतीने उत्तर दिले आहे ते पाहून सगळेच भारावून जात आहेत.
या सप्राईज टेस्टमध्ये शिक्षकांनी मुलांना न्यूटनचा चौथा नियम विचारला आहे. ज्यावर विद्यार्थ्याने उत्तर देताने लिहिले की, 'कोरोना वाढला की अभ्यास कमी आणि कोरोना कमी झाला की अभ्यास वाढतो म्हणजेच, कोरोना अभ्यासाच्या व्यस्त प्रमाणात आहे'. मुलाचे मजेदार उत्तर येथेच थांबलं नाही. तर त्याने याचे सूत्रही पुढे लिहिले आहे.
हा फोटो शेअर करताना IAS अधिकारी अवनीश शरण यांनी मुलाचे वर्णन कोविड काळातील न्यूटन असे केले आहे. हे खरोखरचं खुप मनोरंज आहे, तसेच आजकालची मुलं किती हुशार असतात हे या उत्तरावरुनच दिसत आहे.