मुंबई : जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग (Online Shpping) करताना कोणत्याही फ्रॉडचे (froud) बळी पडला असाल. तर काळजी करू नका. बँकांना तक्रार केल्यास 10 दिवसांच्या आत तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. जर तुमची बँक निश्चित दिवसांमध्ये तुमची अडचण सोडवण्यास असमर्थ ठरली असेल तर, CMS पोर्टलवर म्हणजेच तक्रार नियोजन यंत्रणेवर तक्रार नोंदवू शकता. जर बँकांनी ग्राहकांच्या तक्रारीचे निरसन केले नाही तर, बँकांना रिझर्व बँक दंड ठोठवू शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिझर्व बँक (Reserve Bank Of India)ने सोमवारी ग्राहकांचे हित सर्वतोपरी असल्याचे सांगत, दोन मोठ्या बँकांना दंड ठोठावला आहे. रिझर्व बँकेने एसबीआयवर 1 कोटी आणि स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेवर 1.95 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. एसबीआयने आणि काही वित्तीय संस्थांनी ग्राहकांच्या फसवणूकीच्या संदर्भातील तक्रारींचे निरसन, रिपोर्टिंग आणि इतर नियमांचे उल्लंघन केले. 


व्यवहारांची रक्कम परत करण्यात दिरंगाई केल्याने दंड
स्टॅडर्ड चार्टर्ड बँकेने (standard chartered) अनधिकृत व्यवहारांची रक्कम परत करण्यात दिरंगाई आणि उशीर केल्याने रिझर्व बँकेने दंड ठोठावला आहे. एसबीआयला (SBI) 1 कोटी तर स्टॅंडर्ड चार्टर्ड बँकेला 1.95 कोटी रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. ग्राहकांच्या तक्रारींकडे निश्चित वेळात लक्ष न दिल्याने हा दंड ठोठवण्यात आला आहे. त्यामुळ बँकिंगशी संबधित व्यवहारांबाबत ग्राहकांना आपल्या अधिकारांबाबत माहिती असणे गरजेचे आहे. 


ऑनलाईन शॉपिंग करताना काळजी घ्या
जेव्हा तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताना पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करतात. तेव्हा विशेष काळजी घेण्याची गरज असते. ज्या कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलवरून तुम्ही पेमेंट करीत असाल त्या कॉम्प्युटरमध्ये नेहमीच ऍंटिवायरस असायला हवा. सोबतच आपले सॉफ्टवेअर नेहमीच अपडेटेड असायला हवे. कधीही बँकिंग पासवर्ड कॉम्प्युटरमध्ये सेव करून ठेऊ नये.