तब्बल 2 कोटींना विकला जातो हा मासा; काय आहे या माशाचे अफलातून रहस्य...वाचा
एरोवाना मासे दक्षिण अमेरिकेच्या अमेझॉन नदीत तसेच गुयानाच्या ताज्या पाण्यात सापडतात.
रियो डी जेनेरियो : एरोवाना मासे दक्षिण अमेरिकेच्या अमेझॉन नदीत तसेच गुयानाच्या ताज्या पाण्यात सापडतात. एरोवाना मासे पाण्याच्या पृष्टभागाजवळ पोहणं पसंत करतात.
घरात ठेवल्याने होते प्रगती
एरोवाना मुख्यतः गोड्या पाण्यात राहणारा मासा आहे. लोक या माशाला पाळण्यासाठी मोठी किंमत चुकवायला तयार असतात. हा मासा घरात पाळल्याने प्रगती होत असल्याची इथल्या लोकांची भावना आहे.
50 दिवसांपर्यंत तोंडात ठेवतात अंडे
मीडिया रिपोर्टनुसार एरोवाना मासा आपल्या तोंडात तब्बल 50 दिवसांपर्यंत अंडे ठेवू शकतो. आणि तो तेव्हाच तोंड उघडतो जेव्हा माशाचे पिल्लं थोडे मोठे होतात.
2 कोटींना विकले जातात मासे
हे मासे बलशाली आणि साहसी असतात. एरोवाना मासा 20 वर्षापर्यंत जिवंत राहू शकतात. ते 120 सेंटीमीटर पर्यंत वाढू शकतात आणि त्यांचे वजन 5 किलोपर्यंत होऊ शकते. सामान्य परिस्थितीत हा मासा 1 कोटीच्या जवळपास विकला जातो. तर बाजारात या माशाची किंमत 2 कोटींपर्यंत जाते.
एरोवाना मासा मांसाहारी
एरोवाना मासा मांसाहारी असतो. ज्यावेळी ते जंगलातील पाण्यात असतात. त्यावेळी ते पाण्यातील किडे आणि छोट्या माशांना खातात. जेव्हा ते बंदीस्त असतात तेव्हा ते कासवांचे मास, छोटे मासे, झिंग्यांचे मांस, टैडपौल आणि बरेच काही खावू शकते. हा मासा मांसाहारी खाद्य पसंत करतो.