नवी दिल्ली : दिग्गज ई कॉमर्स  कंपनी ऍमेझॉनने लोकांना आपल्यासोबत कमाई करण्याची संधी दिली आहे. जे लोक कोणत्याही वेळेचे बंधन नसेल अशा नोकरीच्या शोधात असतील. त्या लोकांसाठी चांगली संधी आहे. तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे काम करून 55 ते 60 हजार रुपये महिना कमाई करू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिलिवरी बॉय
ऍमेझॉन भारतात आपला व्यवसाय वाढवत आहे. यासाठी सर्वात महत्वाचे काम म्हणजेच प्रोडक्ट डिलिवरी होय. जवळपास प्रत्येक शहरात कंपनी डिलिवरी बॉयच्या शोधात आहे. यामद्ये ग्राकांना पॅकेज वेअरहाऊसमधून घेऊन घरी पोहचवावे लागते. जर तुम्ही हे काम करू शकत असाल तर ऍमेझॉनच्या वेअरहाऊसशी संपर्क करा.


डेलिवरी बॉयला 100 ते 150 पार्सल एका दिवसात डिलिवरी करावे लागतात. हे पार्सल वेअरहाऊसच्या 10 ते 15 किमीच्या परिसरात असतात. यासाठी 4 ते 5 तास पूरेसे ठरतात. विशेष म्हणजे प्रोडक्टची डिलिवरी सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत होते. यामध्ये तुम्ही तुमच्या योग्य वेळेनुसार टाईमस्लॉट निवडा


अप्लाय कसे करावे?
तुम्हाला डिलिवरी बॉयच्या पोस्ट साठी अप्लाय करायाचे असल्यास,  https://logistics.amazon.in/applynow या लिंकवर जाऊन अप्लाय करावे लागेल. डिलिवरी बॉयजवळ आपले स्वतःचे वाहन असणे गरजेचे आहे.तसेच ड्रायव्हिंग लायसन्स हवे.


डिलिवरी बॉयला कंपनी 12 ते 15 हजार पगार देते. परंतु तुम्ही प्रोडक्ट डिलिवरीच्या हिशोबाने पगार घेतला तर, 150 पार्सल दरदिवसाच्या प्रमाणात तुम्हाला 50 ते 60 हजारापर्यंत महिना कमावता येतो