नवी दिल्ली : देशातच नाही तर संपूर्ण जहात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे. त्यामुळे स्थिती पूर्ववत होण्यासाठी काही काळ निश्चित लागेल. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक स्थरांवर उपाययोजना राबवल्या जात आहेत. कोरोनाचा संसर्ग  रोखण्यासाठी सर्वजनिक स्थळांवर बंदी आणण्यात आली आहे. शिवाय शाळा मंदिरं बंद आहेत. तर काही नियम आणि शर्तींवर राज्यात जिम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यादरम्यान सर्व प्रकारच्या कामांसाठी ऑनलाइन पर्यायाचा वापर होत आहे. फिटनेस ट्रेनिंग, शिक्षण व्यवस्था अन्य महत्त्वाच्या कामांसाठी OnZoom हे नवं ऍप दाखल झालं आहे. या ऍपच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या पैसे कमवू शकतता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

OnZoom च्या मध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय ऑनालाइनद्वारे वाढवू शकता. त्यासाठी तुम्ही ZOOM ऍपचा नवीन ऑनलाइन प्लॅटफॉर्म OnZoomचा  व्पर करू शकता. या नवीन प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही फिटनेस क्लासेस, स्टँडअप्स, मिटिंग्स किंवा इतर सर्व प्रकारचे क्लासेस घेवून घरबसल्या  OnZoomच्या माध्यमातून पैसे कमवू शकता. 


झूमने वापरकर्त्यांना नवीन प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी अनेक सुविधा दिल्या आहेत. यामुळे युजर OnZoomच्या मदतीने  तिकिटे भेट देऊ शकतात आणि उपस्थित डॅशबोर्ड देखील तयार करु शकतात. ऍपला अधिक सुरक्षित करण्यासाठी झूमने Two-Factor Authentication फिचर जारी केले आहे.


या फिचरच्या मदतीने, हॅकिंगला प्रतिबंधित केले जाऊ शकते, विशेषत: ऑनलाइन शाळा-महाविद्यालयीन वर्ग किंवा मिटिंग्स दरम्यान. ZOOMच्या म्हणण्यानुसार OnZoom ही सेवा अमेरिकन युजर्ससाठी पब्लिक Betaवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.