ओम प्रकाश रावत यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती
मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांचा कार्यकाळ येत्या २३ जानेवारीला संपत आहे.
नवी दिल्ली: निवडणूक आयोगाची सर्व सूत्रे ओम प्रकाश रावत यांच्या हाती आली आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांचा कार्यकाळ येत्या २३ जानेवारीला संपत आहे. दरम्यान, मध्यंतरीच्या काही काळात अचल कुमार ज्योती यांनी मुख्य निवडणूक आयूक्त म्हणून कार्यभार सांभाळला होता.
निवडणुक आयोगाच्या नियमानुसार एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो. तर, इतर दोन निवडणूक आयुक्त असतात. राष्ट्रपतींच्या वतीने दोन आयुक्तांमधील ज्येष्ठ असणाऱ्या आयुक्ताकडे निवडणूक आयोगाचे मुख्य आयूक्त म्हणून कार्यभार सोपवण्याची परंपरा आहे.
दरम्यान, रावत यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड झाली. सोबतच अशोक लवासा यांनाही आयुक्त म्हणून नियूक्ती केली जाण्याची घोषणा करण्यात आली आहे. लवासा हे सुद्धा २३ जानेवारीपासूनच आपला पदभार स्विकारतील.