डोकलाम वादाचा चीनला झटका; VIVO,OPPOचे ४०० कर्मचारी परतले
दोन राष्ट्रांतील सीमावादाचा फटका केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणालाच बसत नाही. तो एकूण देशाच्या आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेलाही बसतो. भारतासोबत डोकलामवरून केलेल्या वादाचाही असाच फटका चीनला बसला आहे. या वादाचा परिणाम म्हणून VIVO आणि OPPO सारख्या मातब्बर कंपन्यातील सुमारे ४००हून अधिक कर्मचारी भारतातून चीनला परत गेले आहेत.
नवी दिल्ली : दोन राष्ट्रांतील सीमावादाचा फटका केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणालाच बसत नाही. तो एकूण देशाच्या आणि देशांतर्गत अर्थव्यवस्थेलाही बसतो. भारतासोबत डोकलामवरून केलेल्या वादाचाही असाच फटका चीनला बसला आहे. या वादाचा परिणाम म्हणून VIVO आणि OPPO सारख्या मातब्बर कंपन्यातील सुमारे ४००हून अधिक कर्मचारी भारतातून चीनला परत गेले आहेत.
भारतीय बाजारपेठेतला मोठा अवकाश चीनी उत्पादनांनी व्यापला आहे. त्यात स्मार्टफोन आघडीवर आहे. आजघडीला भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेतील २२ टक्के भागावार चीनचे वर्चस्व आहे. त्यात VIVO आणि OPPO या कंपन्या आघाडीवर आहेत. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या भारत-चीन डोकलाम वादाने दोन्ही देशांतील वातावरण तणावपूर्ण बनले. याचा थेट फटका स्मार्टफोन विक्रीवर झाला. या वादाचा परिणाम म्हणून जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील VIVO आणि OPPOच्या स्मार्टफोन विक्रीत मोठी घसरण झाली. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांतील या दोन्ही कंपन्यांची विक्री सुमारे ३० टक्क्यांनी घटली. त्यामुळे हॅंडसेट ब्रॉडचा मालकीहक्क असलेल्या सुमारे तीन डजन डिस्ट्रीब्युशन कंपन्यातील कर्मचारी चीनला परतले.
दरम्यान, कंपनी एक्झिक्युटीव्हचे म्हणने असे की, भारतातून केवळ VIVO आणि OPPOचेच कर्मचारी चीनला परतले आहेत.
दरम्यान, भारतात गुंतवणूक करणाऱ्या विदेशी कंपन्यांच्या अभ्यासकांनी म्हटले आहे की, आता डोकलाम तिढा बऱ्यापैकी सुटला आहे. तरीसुद्धा हे पडसाद भविष्यातही काही दिवस उमटत राहतील. कंपन्यांनाही याची कल्पना असल्याने व्यवस्थापनाने त्या दृष्टीने पावले टाकायला सुरूवात केली आहे.