मुंबई : सीएनजी पंपाचे मालिक होण्याचा तुम्हाला एक चांगली संधी आहे. त्याचबरोबर महिन्याभरात चांगली कमाई करण्याची संधीही मिळतेय. देशातील प्रमुख कंपन्या सीएनजी पंपच्या डिस्ट्रीब्यूटरच्या प्रतिक्षेत आहेत. राज्यात नवीन सीएनजी पंप ओपन करण्यासाठी आवेदन मागवण्यात आले आहेत. सरकारी उपक्रम गेल आणि एचपीसीएलचे जॉईंट व्हेंचर कंपनी आवंतिका गॅस लिमिटेड प्रदूषणवर लगाम लावण्यासाठी सीएनजी पंप नेटवर्कचा विस्तार करत आहेत. लेटर ऑफ इंटेट जाहिर करताना ५ लाख रुपये रिफंडेबल प्रोसेसिंग फी च्या माध्यमातून जमा करावे लागतील.


त्यासाठी हे गरजेचे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएनजी स्टेशन ओपन करण्यासाठी वाद नसलेल्या प्लॉट असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे ८०० ते १२५० स्क्वेयर मीटरचा प्लॉट आहे ते आवेदन करु शकतात. मात्र हा प्लॉट मुख्य रोडशी जोडलेला हवा आणि अवंतिका गॅस लिमिटेड नॅचरल गॅस पाईपलाईनच्या २ किलोमीटरच्या परिसरात असायला हवी.


डिलरशीसाठी हे करा


अवंतिका गॅसला इंदोर, उज्जेन आणि ग्वालियरमध्ये सीएनजी फ्यूल स्टेशन डिलरची गरज आहे. यासाठी कंपनीने आवेदन करण्याचे आवाहन केले आहे. या तीन शहरात एकूण १२ डिलरशीप आहेत. इंदोरमध्ये ५, उज्जेनमध्ये ४ आणि ग्वालियरमध्ये ३ सीएनजी पंप ओपन करण्याची आवश्यकता आहे. आवेदन करण्यासाठी वेबसाईटवरुन फॉर्म डाऊनलोड करु शकता. फॉर्मसोबत तुम्हाला ३ हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट भरावा लागेल. डिलरशीपसाठी तुम्हाला भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. यासाठी कमीत कमी १० वी पास असणे आणि वय २१ ते ६० वर्ष असणे गरजेचे आहे. लेटर ऑफ इंटेट देताना ५ लाख रुपये रिफंडेबल प्रॉसेसिंग फी द्यावी लागेल. त्यानंतर सीएनजी पंप सुरू करुन तुम्ही लाखोंची कमाई करु शकता.


एकूण इतका खर्च


सीएनजी पंप ओपन करण्यासाठी जमिनीची कागदपत्रे सर्व मिळून एकूण एक कोटी रुपये खर्च होतील. यासाठी तुम्ही बॅंकेतून लोन घेऊ शकता. सर्व कंपन्या आपल्या गरजेनुसार स्टेशन पंपासाठी टेंडर काढेल. त्यासाठी कंपनीच्या वेबसाईटवरुन माहिती मिळेल.


६ कंपन्या सीएनजी पंपासाठी डिस्ट्रीब्यूशन देत आहेत


सध्या देशभरात ६ कंपन्या सीएनजी पंपासाठी डिस्ट्रीब्यूशन देत आहे. यात इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, सेंट्रल युपी गॅस लिमिटेड, ग्रीन गॅस लिमिडेट, महाराष्ट्र गॅस लिमिटेड, गेल गॅस लिमिटेड आणि वडोदरा गॅस लिमिडेट यांचा सहभाग आहे. गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड देशभरात सीएनजी डिस्ट्रीब्यूशनबरोबरच विभिन्न कंपन्यांसोबत ज्वॉईंट व्हेंचर बनवले आहे. याचा अंतर्गत कंपनी दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, त्रिपूरा इत्यादी ठिकाणी गॅस सप्लाय करेल.