हरिद्वार: देशातील बहुसंख्य जनता हिंदू असल्याने विरोधक राम मंदिराच्या उभारणीला विरोध करू शकणार नाहीत, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते मंगळवारी पतंजली योगपीठात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, विरोधकांच्या मनात असूनही ते राम मंदिराच्या उभारणीला जाहीरपणे विरोध करणार नाहीत. कारण देशातील बहुसंख्य जनता हिंदू आहे. श्रीरामावर त्यांची श्रद्धा आहे. संघ आणि भाजपा अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी कटिबद्ध आहेत. मात्र काही गोष्टींसाठी वेळ लागतो, असे भागवत यांनी सांगितले. 


चांगले काम करणारा पक्ष सत्तेत असायला हवा. कोण सत्तेत आहे, हेदेखील अतिशय महत्त्वाचे असते. प्रत्येक सरकारच्या काही मर्यादा असतात. त्या मर्यादांचे भान ठेवूनच सरकारला काम करावे लागते. मात्र, संतांना अशा मर्यादांचे बंधन नसते. त्यामुळे त्यांनी देश, धर्म आणि समाजाच्या उत्थानासाठी काम केले पाहिजे, असे भागवत यांनी सांगितले.