Old Pension Scheme : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) पुन्हा लागू करावी, ही कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यादरम्यान राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने अखेर जुन्या पेन्शन स्कीमवला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पंजाब राज्य सरकारने (Punjab Goverment) हा निर्णय घेतला आहे. (ops punjab bhagwant man government give approved to old pension scheme) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंत्रिमंडळाच्या बैठकीत जुन्या पेन्शन स्कीमबाबत चर्चा झाली. या बैठकीत अखेर सर्वांच्या संमतीने मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जुन्या पेन्शन स्कीमबाबत निर्णय घेतला. त्यामुळे आता सर्व कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. पंजाजबमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यासाठी अनेकदा आंदोलन करण्यात आली. 


दरम्यान नव्या पेन्शन योजनेच्या तुलनेत जुन्या पेन्शन योजनेत फायदा आहे. जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांचं भविष्य सुरक्षित असल्याचीही भावना आहे. त्यामुळे आता पंजाब प्रमाणे इतर राज्य सरकारही जुन्या पेन्शनबाबत काय भूमिका घेतात, याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष असणार आहे.