Optical Illusion Viral Photo:  एखाद्या चित्रात प्राणी शोधणे किती अवघड असते, हे गेल्या काही दिवसांत ऑप्टिकल इल्युजन असलेल्या चित्रांतून आपण पाहिलंय. यावेळीही तुम्हाला तुमच्या बुद्धीला चालना द्यावी लागेल. ऑप्टिकल इल्युजनचे आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंटरनेटवर दररोज अशी फोटो व्हायरल होतात आणि लोकं यातील प्रश्न कोडी सोडवण्याचा प्रयत्न करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोमध्ये तुम्हाला हरिण दिसले का?


आता आणखी एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये जंगलातील गवतात आणि झुडपांमध्ये एक हरिण लपले आहे. मात्र, या फोटोतील हरिणाचा शोध घेणे सोपं नाही. फोटो शोधण्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असायला हवी असावेत. जंगलात सगळीकडे गवत आहे.त्यामुळे हरिणाचा शोध घेणं तुमच्यासाठी आव्हान आहे.


या फोटोमध्ये तुमच्या डोळ्यासमोर एक प्राणी उभा आहे, पण तो तुम्हाला सहजासहजी दिसणार नाही. प्रथम तुम्ही प्राण्याचा म्हणजेच हरिणाचा डोळा शोधण्याचा प्रयत्न करा, मग तुम्हाला संपूर्ण शरीर दिसेल.


फोटो बारकाईने पाहिल्यास हरिण सापडणार


ज्यांना काही मिनिटांत हरिण सापडले ते खरंच जीनियस आहेत. जर तुम्हाला अजूनही चित्रात हरण दिसत नसेल तर चला आम्ही सांगतो...


चित्राच्या उजव्या भागाच्या कोपऱ्यात पहा, तुम्हाला एक हरण उभे असलेले दिसेल. हरणाला दोन शिंगे असून तपकिरी रंगाचे पूर्ण शरीर दिसते. छायाचित्रकार फोटो क्लिक करत असताना हरीण कॅमेऱ्याकडेच बघत होते.