मुंबई : ऑप्टीकल इल्जूजनचे फोटो हे असे फोटो असतात की, त्यांना तुम्ही जितकं समजून घेण्याचा प्रयत्न कराल तितकं ते तुम्हाला आणखी गोंधळात टाकतात. परंतु असे असले तरी, त्यांना शोधण्याचे चॅलेंज स्वीकारणे लोकांना फार आवडते. म्हणूनच तर सोशल मीडियावर आपल्याला यासंबंधीत अनेक फोटो ट्रेंड होताना पाहायला मिळतात. आता देखील असाच एक फोटो व्हायरल होत आहे. जो लोकांना विचारात पाडत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक ऑप्टिकल इल्जूजन असे असतात, ज्याचे उत्तर शोधण्यासाठी 99 टक्के लोक अयशस्वी ठरतात. असे मोजकेच लोक असतात ज्यांना याप्रश्नांची उत्तर शोधता येतात. आता तुम्ही त्या मोजक्या 1 टक्के लोकांमध्ये असाल, तर या फोटोमध्ये लपलेला पेंग्वीन शोधून दाखवा.


हे ऑप्टिकल इल्जूजन चित्र हंगेरियन कलाकार गेर्गेली डुडास यांनी तयार केले आहे, ज्याला डुडॉल्फ असेही म्हणतात. फोटोत तुम्ही पाहू शकता की अनेक टूकन पक्ष्यांच्या चोची दिसत आहेत आणि त्यांच्यामध्ये एक पेंग्विन कुठेतरी लपला आहे, जो शोधणे समुद्रात सुई शोधण्यासारखंच आहे.


आता पाहा तुम्हाला 10 सेकंदात यापक्षांमधला पेंग्वीन शोधता येतोय का? जर तुम्हाला पेंग्वीन दिसला नसले, तरी काळजी करु नका. आम्ही तुम्हाला तो शोधण्यासाठी मदत करणार आहोत.


खाली स्क्रोल करा
.
.
.
.
.




पाहा इथे लपलाय फोटो. खूप साऱ्या पक्षांमध्ये उजवीकडे लपलाय पेंग्वीन. तुम्हाला आजूनही तो दिसला नसेल तर खालचा फोटो पाहा


आता तरी तुम्हाला पेंग्वीन दिसला असेल. आता हा फोटो तुमच्या मित्रांना पाठवा आणि पाहा त्यांना पेंग्वीन शोधून काढता येतोय का.