Valentine Week चं खास चॅलेंज... या फोटोत 7 Heart शोधून दाखवा! Romatic व्यक्तींना 11 सेकंदात सापडतं उत्तर
Valentine Week Optical Lllusion: सध्या व्हॅलेंटाइन्स वीक सुरु असल्याने सोशल मीडियावर हा फोटो एक कोडं म्हणून तुफान व्हायरल झाला असून अनेकजण हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.
Can You Spot 7 Hearts Hidden Inside Painting: एखादी गोष्ट पाहून त्यामधून दोन वेगवेगळे अर्थ निघत असतील किंवा प्रतिकृती दिसत असतील तर अशा फोटोला ऑप्टिकल इल्यूजन (optical illusion) असं म्हणतात. मग ही गोष्ट एखादा फोटो असेल, वस्तू असेल किंवा चित्र असेल. सध्या इंटरनेटवर असे नजरेला चकवा देणारे अनेक फोटो व्हायरल होत असतात. आपल्या नजरेला जे प्रथमदर्शनी दिसतं तसं नसतं किंवा त्याहून अधिक काहीतरी त्या गोष्टीत असतं. नीट निरखून पाहिल्यानंतर या लपलेल्या गोष्टी दिसतात. हे असे ऑप्टिकल इल्यूजन डोळ्यांबरोबरच मेंदूचीही परीक्षा घेतात. सध्या व्हॅलेंटाइन विक सुरु आहे. याच निमित्ताने सोशल मीडियावर प्रेमासंदर्भातील एक ऑप्टिकल इल्यूजनचं कोडं व्हायरल झालं आहे. नेमकं हे कोडं काय आहे पाहूयात...
अनेक अभ्यासांमध्ये दिसून आलं की...
अनेक अभ्यासांमध्ये असं दिसून आलं आहे की ऑप्टिकल इल्यूजनचे प्रकार हे व्यक्तीच्या ऑब्झर्वेशन स्कीलवर अवलंबून असतात. या अशा ऑप्टिकल इल्यूजनमुळे बुद्धीला चालना मिळते आणि ऑब्झर्वेशन स्कील अधिक सक्षम होतात. त्यामुळेच हल्ली इंटरनेटवर अशा गोष्टी व्हायरल होण्याचं आणि ती सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या वाढल्याचं दिसतं. आज आपण एका पेटिंगबद्दल बोलत आहोत ज्यामध्ये 7 हार्ट शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. केवळ रोमॅन्टीक लोकच हे चॅलेंज 11 सेकंदांमध्ये पुर्ण करु शकतात असं म्हटलं जात आहे.
तुम्हाला जमतंय का बघा...
ही पेटिंग नीट पाहिली तर यामध्ये अनेक गोष्टी रेखाटल्या आहेत. या पेटिंगला सेव्हन हार्ट्स नावाने ओळखलं जातं. हे पेटिंग खरं तर एक कोडं आहे. यामध्ये जागोजागी हार्ट काढण्यात आले आहेत. या फोटोमध्ये 7 हार्ट शोधून दाखवा असं चॅलेंज करत तो सध्या व्हॅलेंटाइन विकदरम्यान व्हायरल केला जात आहे. खरं तर एक हिंट द्यायची झाली तर या फोटोमध्ये वेगवेगळ्या जागी हार्ट लपले आहेत. तुम्हाला हे शोधता येतात का पाहा बरं...
इथं आहेत ही 7 हार्ट्स
खरं तर आम्हाला विश्वास आहे की तुम्ही दिलेल्या चॅलेंजप्रमाणे 11 सेकंदांमध्ये सर्व 7 हार्ट शोधले असतील. मात्र जर तुम्हाला हे जमलं नसेल तर हिंट लक्षात आहे ना? हे सर्व हार्ट एका जागी नसून लपलेले आहेत. काही हार्ट लगेच दिसतात तर काही शोधण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते. या कोड्याचं उत्तर द्यायचं झालं आणि 7 हार्ट कुठे आहेत सांगायचं एक हार्ट आकाशात आहे. एक दोन झाडांच्या मध्यभागी आहे, एक तलावात, एक ढगात आहे. तसेच दोन हंसांमध्येही एक हार्ट आहे. एक डोंगराजवळ तर एक गवतात आहे. नेमकं कुठे आहेत हे हार्ट पहायचं झाल्यास खालील फोटो पाहा...
तुम्हाला यापैकी किती हार्ट सापडले होते? कमेंट करुन नक्की कळवा.