Optical Illusion: स्मार्ट असाल तर `या` चित्रातील साप 5 सेकंदात शोधून दाखवा!
या फोटोत एक साप लपला आहे आणि तो तुम्हाला शोधायचा आहे.
optical illusion : ऑप्टिकल इल्युजनची अनेक चित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक फोटो आता व्हायरल होत आहे. या फोटोतील साप तुम्हाला शोधायचा आहे. अनेकांना या फोटोतील साप शोधण्यात अपयश आलं आहे. फोटोमध्ये अनेक कासवांमध्ये साप लपून बसला आहे. तुम्हाला शोधण्यात यश येतंय का ते पाहा.
जर तुम्ही फोटो नीट बघितलात तर तुम्हालाही हे कोडे सोडवण्यात यश येईल. फक्त तुमचे सर्व लक्ष फोटोकडे व्यवस्थित ठेवा आणि पाहात रहा. जर तुम्हाला साप सापडला, तर तुमचं अभिनंदन. तुमचा समावेशही बुद्धिमत्ता असलेल्या लोकांच्या यादीत समावेश झाला आहात. पण जर तुम्हाला साप दिसला नसेल तर खाली दिलेला फोटो बघा.
हा फोटो बारकाईने पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की कासवाची मान थोडी वेगळी दिसत आहे. इतकंच नाही तर तुम्ही नीट लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हाला दिसेल की तिची जीभही बाहेर आली आहे, म्हणजे तो कासव नसून साप आहे.