Optical Illusion : काहीवेळा जे फोटोत दिसते ते प्रत्यक्षात नसते. ते समजून घेण्यासाठी आपल्या मनावर थोडा जोर द्यावा लागेल. अशा चित्रांना ऑप्टिकल इल्युजन म्हणतात. सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्युजन फोटो व्हायरल होत आहेत. नेटिझन्सही अशा चित्रांवर काही सेकंद थांबून प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. अशाच आणखी एका फोटोची ओळख करुन घ्या. हे असे चित्र आहे, थोडावेळ पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की काही गोष्टी हलत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हालाही यात फिरणारा चेंडू दिसतो का?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणखी एका ऑप्टिकल इल्युजन फोटोने लोकांना दे धक्का दिला. पहिल्या दृष्टीक्षेपात जेव्हा तुम्ही चित्र पहाल तेव्हा एक गोल बॉल फिरताना दिसेल आणि पाठीमागची पार्श्वभूमी पाहून तुमचा होश उडून देईल. आता  तुम्हाला असे दिसेल की मागील बाजू खाली जात आहेत. हे ऑप्टिकल इल्युजन पिक्चर पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल, कारण त्यात कोणताही GIF किंवा छोटा व्हिडिओ नाही. हिरवा आणि आकाशी रंग असलेले हा फोटो पाहून यूजर्सही आश्चर्यचकित झाले आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर एका यूजरने सांगितले की, काही सेकंद या फोटोकडे पाहिल्यानंतर माझे डोके गरगरायला लागले. चक्कर सारखा प्रकार जाणवला.



फक्त 5 सेकंद पाहा, चक्कर येईल


ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो पाहिल्यानंतर अनेकदा लोक गोंधळून जातात. या फोटोनेही लोकांचा विचार केला. हा फोटो इंटरनेटवर व्हायरल होताच, हे काय आहे याबद्दल लोक संभ्रमात पडले आहेत. हा विचार करायला लावणारा फोटो लोकांना थक्क करणारा आहे. यूजर्स हा फोटो लोकांसोबत शेअर करत आहेत आणि विचारत आहेत की तुम्हाला ते हलताना दिसत आहे का? हे Optical Illusion चित्र असे आहे, जे डोळ्यांना फसवणारे आहे. चित्र काळजीपूर्वक पाहा आणि पहिल्या दृष्टीक्षेपात कसे वाटले ते सांगा.