Optical Illusio Photo Of Orange And Melon: ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. कारण या फोटोमध्ये दडलेल्या वस्तू शोधण्यात वेगळीच मजा असते. प्रवासात किंवा फावल्या वेळेत तेवढाच टाईमपास होतो. कोड्यामुळे डोळे आणि बुद्धीचा कस लागतो. असाच एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या फोटोत संत्र्याच्या फोडी दिसत आहेत. या फोडींमध्ये टरबूजाची फोड लपलीय आणि तीच आपल्याला शोधायची आहे. पण हा फोड शोधण्यासाठी फक्त दहा सेकंदाचा अवधी आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये टायमर सेट करून शोध मोहीम सुरु करा. फोटोवर आपली नजर फिरवा आणि बुद्धीचा कस लावा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑप्टीकल इल्यूजनमधील (Optical Illusion) फोड शोधताना दहा सेकंदाचा अवधी संपला तरी काळजी करू नका. पुन्हा एकदा प्रयत्न करा आणि फोटो पाहा. आता तुमची नजर मधोमध ठेवा आणि थोडं खाली या. तिथे तुम्हाला टरबूजाची फोड दिसेल. टरबूजची फोड संत्र्याच्या तुकड्यांमध्ये सेट करण्यात आली आहे.


विमानात मोबाईल Flight Mode वर का ठेवला जातो? जाणून घ्या


ऑप्टिकल इल्युजन असलेला फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकमेकांना टरबूजाची फोड शोधण्याचं आव्हान देत आहेत. अनेकांना फोटोतील फोड शोधणं कठीण जात आहे. मात्र काही जण चुटकीसरशी ऑप्टिकल इल्युजन फोटोतील फोड शोधत आहेत. तुम्हीही ऑप्टिकल इल्यूजन चॅलेंज इतर लोकांना द्या आणि त्यांना शोधता येतं का बघा.