Optical Illusion Numerical Test: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो व्हायरल होत असतो. या फोटोच्या माध्यमातून बौद्धीक क्षमतेची तपासली जाते. तसं पाहिलं तर एक दोन ऑप्टिकल इल्यूजन तुमचं व्यक्तिमत्त्व ठरवू शकत नाही. पण मनोरंजन म्हणून या फोटोच्या माध्यमातून आनंद घेऊ शकता. असाच एक नंबर असलेल्या ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑप्टिकल इल्यूजन फोटोतील झिग-झॅग पॅटर्नमुळे वर्तुळात लपलेली संख्या शोधायची आहे. झिग-झॅग फोटो डोळ्यासमोर फिरत असल्याचं जाणवतं.  हा फोटो व्यवस्थित पाहून तुम्हाला नंबर ओळखायचा आहे. या ऑप्टिकल इल्यूजन न्युमरिकल टेस्टच्या माध्यमातून तुमची तीक्ष्ण नजर कळून येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ऑप्टिकल इल्यूजन फोटोत 'तुम्हाला काही आकडे दिसत आहेत का? जर होय, तर कोणते आकडे?' या ब्लॅक अँड व्हाईट फोटोत सहा अंक दडलेले आहेत. हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो तुमची दृष्टी तपासण्याचा एक मजेशीर मार्ग आहे. या ऑप्टिकल इल्यूजन फोटोत लोकांना चार संख्यांचे तीन वेगवेगळे संयोजन दिसत आहेत. तुम्ही पाहिलेली संख्या लक्षात ठेवा आणि खाली दिलेली माहिती वाचा. तुमचं उत्तर योग्य असेल तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. 



सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जणांना 45283 हा नंबर दिसला आहे. तर काही जणांना 528 या नंबरवर पहिली नजर पडली. अनेक जणांना तर वेगळाच नंबर दिसला. जर तुम्हीही या नंबरबाबत संभ्रमात असाल तर त्याचं योग्य उत्तर  '3452839' आहे.