वर्तुळ फिरतोय की त्यामधील बाण... हा व्हिडीओ तुम्हाला चक्रावून सोडेल
हा व्हिडीओ पाहून तुमचे डोळेच काय, तर तुमचं डोकं देखील चक्रावेल.
मुंबई : ऑप्टिकल इल्यूजन हा प्रकार तुम्ही एकला असाल. हे असं काहीतरी असतं, जे आपल्या डोळ्यांना धोका दंतं (optical illusion) आणि आपल्या मेंदूला विचार करायला भाग पाडतं. ज्यामुळे आपल्याला काय चूक, काय बरोबर याचा विचार करता येत नाही किंवा ते आपल्याला गोंधळात टाकतं. सोशल मीडियावर एक नवीन ऑप्टिक्ल इल्यूजनची चर्चा होत आहे. जी आज आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. जे पाहून तुमचे डोळेच काय, तर तुमचं डोकं देखील चक्रावेल. परंतु तुमच्यासोबत काय चाललंय, हे मात्र तुम्हाला कळणार नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत तुम्हाला दोन वर्तुळ दिसत आहे. ज्याच्या आतमध्ये एक-एक असे दोन बाण आहेत. या सगळ्याचा रंग सतत बदलतं असतो. या व्हिडीओकडे एकटक पाहिल्यावर तुमचे डोळे मात्र चक्रावतील.
हा व्हिडीओ तुम्ही नीट पाहाल तर याचं बॅकग्राइउंड गडद राखाडी रंगाचं आहे. ज्यावर दोन वर्तुळ आहेत, ज्याचे रंग बदलत आहेत. एवढंच काय तर या दोन्ही वर्तुळांच्या आत एक-एक बाण आहे. जो आपली दिशा बदलत आहे, शिवाय तो आपला रंग देखील बदल आहे. ज्यामुळे एक ऑप्टिकल इल्युजन तयार होत आहे. (optical illusion)
हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन लोकांना प्रश्न विचारला जात आहे की, तुम्हाला काय वाटतं यामध्ये वर्तुळ हलतंय? की बाण? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधता येतंय का ते एकदा पाहा.
एका जपानी ट्विटर वापरकर्त्या हे व्हिडीओ शेअर केला आहे. परंतु त्याने सर्व जगाची झोप उडवून टाकली असेल, असं म्हणण्यात काही हरकत नाही. कारण हा व्हिडीओ आता भारतात देखील ट्रेंड करु लागला आहे.