मुंबई : तुम्हाला तर आता माहितच आहे की, इंटरनेट हे एक असं माध्यम आहे जिथे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी नव्याने जाणून घेता येतात. सध्या इथे ऑप्टीकल इल्यूजन संबंधीत अनेक फोटो समोर आले आहेत. त्यांपैकी एक व्हिडीओ हा खूपच ट्रेंड करत आहे. खरंतर हे व्हिडीओ किंवा फोटो तुमची तीक्ष्ण दृष्टी आणि मेंदूच्या समन्वयाला आव्हान देतात. आता समोर आलेला व्हिडीओ तुम्हाला चक्रावून टाकेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ऑप्टीकल इल्यूजन फोटोमध्ये समोर आलेला व्हिडीओमध्ये दोन क्यूब किंवा दोन घन आकृतू आहे. ज्या गोल गोल फिरत आहेत. परंतु तुम्हाला जर त्याची दिशा सांगायला सांगितली तर तुम्ही चक्रावून जाल.


हा व्हिडीओ @jagarikin या हँडलसह मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवरुन शेअर करण्यात आले आहेत. ऑप्टिकल इल्युजन चित्र शेअर करण्यात आले आहे.


ज्यामध्ये दोन घन विरुद्ध दिशेने जाताना दिसतात. पण तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की हे दोन्ही घन त्यांच्या जागी स्थिर आहेत. ते जराही हलत नाहीत. खरं तर, हे चित्र आपल्या डोळ्यांद्वारे आपल्या मनाची फसवणूक करण्याचे काम करत आहे. तर प्रथम हा ऑप्टिकल इल्यूजनचा व्हिडीओ पाहा



जेव्हा तुमचे डोळे त्यांना पाहतात तेव्हा तुमचा मेंदू असे समजतो की, घन विरुद्ध दिशेने जात आहेत. हा एक अद्भुत भ्रम आहे, जो प्रत्येकासाठी संभ्रम निर्माण करत आहे.


GIF फॉरमॅटमध्ये शेअर केलेला व्हिडीओ आणखी एका ट्विटर यूजर स्टीव्ह स्टीवर्ट विल्यम्सनेही शेअर केला आहे.