पतीचे अपहरण करून खून करण्यासाठी पत्नीनेच (wife given order to kill the husband) तीन गुंडांना सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार बंगळुरु (bengaluru) येथे उघडकीस आला आहे. आपण आखलेली योजना पूर्ण होईल असे महिलेला वाटलं होतं पण झालं भलतचं. महिलेला केलेला प्लॅन तिच्यावरच उलटला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपारी घेणाऱ्या गुंडांनी अपहरण केलेल्या पतीची हत्या करण्याऐवजी त्याच्याशी मैत्री केली आणि हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.


नेमकं काय घडलं?


या गुडांनी महिलेच्या पतीसोबत जोरदार पार्टी केली आणि त्याच्या अंगावर टोमॅटो केचप टाकून त्याला झोपवलं. त्यानंतर त्याचे काही फोटो काढून महिलेला पाठवले आणि सांगितले की, तुझ्या नवऱ्याला आम्ही मारले आहे. 


त्यानंतर आता पोलिसांनी अनुपलवी नावाच्या महिलेला अटक केली आहे. अनुपलवीने पतीच्या हत्या करण्याचे काम गुंडांना दिलं होतं. पोलिसांनी याशिवाय अनुपलवीची आई अम्मोजम्मा हिलाही अटक केली आहे. तसेच अपहरण आणि हत्येची सुपारी घेणाऱ्या हरीश, नागराजू आणि मुगिलन या गुंडांनाही अटक करण्यात आली आहे. 


अनुपलवीचे हिमवंत कुमार याच्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे पोलिसांचे सांगितले. त्यामुळे या दोघांनी महिलेचा पती नवीन कुमार याला मारण्यासाठी काही गुंडांना सुपारी दिली होती. 


दोघांनी गुंडांना 90 हजार रुपये आगाऊ दिले होते आणि काम पूर्ण झाल्यावर 1.1 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर नवीनचे २३ जुलै रोजी अपहरण करून तामिळनाडूला नेण्यात आले होते. पण तिथे त्यांचा विचार बदलला आणि त्यांनी नवीनला मारण्याऐवजी त्याच्यासोबत जोरदार पार्टी केली.


प्रियकराने घेतला गळफास


दरम्यान नवीन दारूच्या नशेत आडवा झाला. यानंतर गुंडांनी त्याच्या अंगावर टोमॅटो केचप टाकला आणि त्याचे फोटो अनुपलवी आणि तिचा प्रियकर हिमवंत यांना पाठवले. हे फोटो पाहून प्रियकर हिमवंत घाबरला आणि त्याने गळफास लावून घेतला.


मात्र नवीनच्या बहिणीला वाटले की तिचा भाऊ बेपत्ता झाला असावा. त्यामुळे तिने बेंगळुरूमधील पेनिया पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. मात्र नवीन स्वतः ६ ऑगस्टला घरी परतला.


दरम्यान, पोलिसांनी नवीनला तो इतके दिवस कुठे होता याबाबत विचारणा केली. यावर नवीनने आपले अपहरण झाल्याचे सांगितले. त्यासाठी हिमवंतने गुंडांना सुपारी दिली होती. तपासादरम्यान नवीनची पत्नी अनुपलवी आणि त्याची आईही यामध्ये सामील असल्याचे  समोर आले. पोलिसांनी आई-मुलींसह तीन नराधमांना अटक केली आहे.