नवी दिल्ली : पर्मनंट अकाऊंट नंबर म्हणजेच पॅन कार्ड आधारशी लिंक करणे सक्तीचे केल्यानंतर आतापर्यंत तब्बल ९.३ कोटीहून अधिकांनी पॅन आधारशी लिंक केलेत. आयकर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील साधारण ३० कोटीहून अधिक लोकांकडे पॅनकार्ड आहेत. यापैकी ३० टक्के पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यात आलेत. जून ते जुलैदरम्यान ३ कोटी पॅनकार्ड आधारशी लिंक झालेत.


अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आयटीआर फाईल करण्यासाठी तसेच नवा पॅन नंबर मिळवण्यासाठी पॅनकार्ड आधारशी लिंक कऱणे गरजेचे असते. एक जुलैपासून हे सक्तीचे करण्यात आलेय. 


अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभेत याबाबत माहिती दिली होती. पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यासाठी अद्याप डेडलाईन निश्चित कऱण्यात आलेली नसल्याचे त्यांनी लोकसभेत सांगितले होते.