हैदराबाद : पद्मावत सिनेमाच्या बाबतीत सध्या देशात वाद सुरु आहे.


पद्मावतवर टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबादचे लोकसभा खासदार आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. ओवैसींनी मुस्लीम लोकांना हा सिनेमा न पाहण्याचं आवाहन केलं आहे.


सिनेमाला काहीही किंमत न देता ओवैसींनी म्हटलं की, 'अल्लाहने लोकांना वेळ असे सिनेमे बघण्यासाठी नाही दिली आहे. तुम्ही लोकं सिनेमा पाहून तुमचा वेळ आणि पैसा वाया घालवू नका.' आंध्र प्रदेशमध्ये एका सभेत बोलतांना त्यांनी ही वक्तव्य केलं आहे.


काल्पनिक कथा


असदुद्दीन ओवैसींनी सिनेमाला काडी मात्र किंमत दिलेली नाही. ओवैसींनी म्हटलं की, 'सिनेमाच्या मागे धावू नका. अल्लाहने जीवन जगण्यासाठी आणि काही चांगलं काम करण्यासाठी दिलं आहे. पंतप्रधान मोदींनी या बकवास सिनेमाच्या रिव्ह्यूसाठी 12 लोकांचं पॅनल देखील बनवलं आहे. पद्मावतची कथा 1540 मधील कवि मलिक मोहम्मद जायसी यांनी लिहिली होती. जी पूर्णपणे काल्पनिक होती. यानंतर देखील मोदी सरकार या सिनेमाबाबत सकारात्मक आहे.'


सुप्रीम कोर्टाची परवानगी


सुप्रीम कोर्टाने पद्मावत सिनेमा प्रदर्शित होण्याचा मार्ग गुरुवारीच मोकळा केला आहे. काही राज्यांनी या सिनेमावर लावलेली बंदी हटवण्याचे आदेश देत सुप्रीम कोर्टाने संपूर्ण भारतात हा सिनेमा प्रदर्शित करण्याची परवानगी दिली होती.