इंडिगो एअरलाईन्सची ८४ उड्डाण रद्द !
विमानातील इंजिनात होणार्या बिघाडाच्या वाढत्या घटनांनी इंडिगो एअरलाईन्सची डोकेदुखीही वाढली आहे.
मुंबई : विमानातील इंजिनात होणार्या बिघाडाच्या वाढत्या घटनांनी इंडिगो एअरलाईन्सची डोकेदुखीही वाढली आहे.
प्रॅट अँड व्हिटनी (पीडब्ल्यू) इंजिनमधील बिघाड झाल्याने इंडिगोने ८४ विमान सेवा रद्द केल्या आहेत. तर सोबतच १३ ' ए ३२० नीओ' या प्रकारातील विमानांची उड्डाणंही थांबवली आहेत.
‘इंडिगो एअरलाईन्स’या कंपनीच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी इंडिगोचे अहमदाबादवरुन कोलकात्याला जाणाऱ्या विमानाचे नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिग करावे लागले . विमानाचे एक इंजिन फेल झाले होते. पीडब्ल्यू इंजिन असलेल्या सुमारे २० विमानांमध्ये असे तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्याने हवाई वाहतूक महासंचालनालयानेही दखल घेतली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, १३ दिवसात तब्बल ६६७ उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. त्यापैकी २१-३० जून दरम्यान सुमारे ५०४ उड्डाणांचा समावेश आहे.